Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील काठी येथील डॉ. गिरिम्या रोता राऊत यांची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
गिरिम्या यांचे वडीलांचे लहानपणीच निधन झाले होते. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांनी लहानपणापासूनच हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करून पैसे कमवायला सुरुवात केली.
(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गरिबीतून शिकून डॉक्टर होण्याचे स्वप्न त्यांनी बाळगलेले होते. त्यांनी आश्रमशाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. बारावीत चांगले गुण मिळाल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएसला प्रवेश मिळाला.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी धुळे आणि जळगाव जिल्ह्यात इंटर्नशिप पूर्ण केली. त्यानंतर अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली.
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
- Nandurbar News : नंदुरबार शहरात पोलिसांची दारू प्रकरणी यशस्वी कारवाई…!
- Nandurbar News : महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा..!
डॉ. गिरिम्या राऊत यांनी आपल्या परिस्थितीवर मात करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांचा हा प्रवास इतर गरीब तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.
“लहानपणापासून डॉक्टर होण्याची जिद्द मनामध्ये होती. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने दोन पैसे कमावण्यासाठी हॉटेलमध्ये काम केले. आश्रमशाळेतून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. याचे मला खूप समाधान वाटते. प्रत्येक तरुणाने स्वत:च्या प्रगतीत आर्थिक परिस्थितीचा अडथळा न मानता त्यावर मात करून ध्येय गाठले पाहिजे.” – डॉ. गिरिम्या राऊत, सामुदायिक वैद्यकीय अधिकारी, काठी अक्कलकुवा