Nandurbar News : आदर्श कसबे चिलाणे येथे विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न..!

0
128
nandurbar-news-bharat-sankalp-yatra-developed-at-adarsh-kasbe

Nandurbar News – तालुक्यातील आदर्श कसबे चिलाणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती एलईडी व्हॅन मार्फत देवुन जनजागृती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रेचे देशभरातून आयोजन करण्यात येत आहे. त्या पाश्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील आदर्श कसबे चिलाणे येथे ग्रामपंचायत च्या वतीने सदर यात्रेचे स्वागत केले.

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

nandurbar-news-bharat-sankalp-yatra-developed-at-adarsh-kasbe

सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे सरपंच जितेंद्र विनायक सोनवणे यासह मान्यवरांच्या हस्ते पुजन केले. तर विकसित भारत संकल्प रथयात्रेचा फित कापून पंचायत समिती सदस्य प्र. अरुण सोनवणे यांनी उद्घाटन केले. प्रास्तविक व सुत्रसंचालन ग्रामसेवक निलेश युवराज निकम यांनी केले. हयाप्रंसगी माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य प्र. अरुण सोनवणे ,सरपंच जितेंद्र विनायक सोनवणे, उपसरपंच महेंद्र दयाराम भिल, संपर्क अधिकारी सी.एस.खर्डे , धमाणे प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. ललितकुमार चंद्रे , ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी संतोष सावकारे ,भिका पाटील, ग्रा.पं.सदस्य दिपमाला रविंद्र पाटील, कुसुमबाई भिमराव पाटील, नामदेव किसन मगरे,मयुर विलास पाटील,गोपाल अभिमन्यू डिगराळे ,लिलाबाई किसन मगरे, पुनम गुलाबसिंग भिल, सुरज आनंदसिंग गिरासे, लिपिक मच्छिंद्र वनसिंग भिल यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

nandurbar-news-bharat-sankalp-yatra-developed-at-adarsh-kasbe

सदर यात्रेदरम्यान लाभार्थीकडुन विविध योजनांचे अर्ज भरुन घेऊन लाभार्थीना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. यात आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड , उज्वला गॅस नोंदणी करण्यात आली. यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.यावेळी मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत प्रधानमंत्री आवास लाभार्थी दिपक बैसाणे सह इतर लाभार्थीने मनोगत व्यक्त केले. आपल्या गावात प्रत्यक्ष विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांना उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञान विकसित ड्रोनच्या साह्याने फवारणी यंत्राची माहिती व प्रात्यक्षिके करुन दाखविले. हयाप्रंसगी प्राथमिक आरोग्य केंद्र धमाने तर्फे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ललितकुमार चन्द्रे, समुदाय अधिकारी डॉ. नम्रता पाटील, कमल गड्री, यास्मिन शाह, राजेंद्र भादने, सुवर्णा पाटील, महेन्द्र पाटील, कलीम शेख, देवराम वसावे व चिलाणे कार्यक्षेत्रातील सर्व आशा उपस्थित होते. या दरम्यान, येथील ग्रामस्थांचे रक्तदाब, रक्त शर्करा, सिकल सेल चाचणी, गरोदर माता तपासणी, तसेच आभा कार्ड व आयुष्मान कार्ड नोंदणी करण्यात आली.

डॉ. ललितकुमार चन्द्रे, यांनी थोडक्यात आरोग्य विषयी माहिती दिली. कोरोना आजार,पुन्हा परतल्याने, त्यांनी सर्वांना घाबरून न जाता, योग्य ती खबरदारी घेण्याचे, सर्व ग्रामस्थांना विनंतीपूर्वक आवाहन केले. सदर कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी कार्यकर्ति ,मदतणिस ,आशा वर्कर , बचत गट अध्यक्ष , ग्रामस्थ व लाभार्थी तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर यात्रेचे चे सुंदर नियोजनासाठी ग्रामपंचायत सरपंच जितेंद्र सोनवणे , उपसरपंच महेंद्र भिल ,सह सदस्य , ग्रामसेवक निलेश निकम, लिपिक मच्छिंद्र भिल ,रोजगार सेवक ललित परदेशी, शिपाई रविंद्र पाटील, संजय परदेशी यांनी करताना परिश्रम घेतले. आभार ग्रामसेवक निलेश निकम यांनी मानले.

शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here