Nandurbar News – शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाणे अंतर्गत येणारे रायखेड येथील दूरशेत्र पोलीस चौकीचे नूतनिकरणचे विशेष पोलीस महानिरीक्षक नासिक परीक्षेत्र बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते नवीन इमारतीचे उठघाट्न करण्यात आले.
सुरुवातीला महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा करून ढोलच्या तालावर नृत्य करीत महानिरीक बी जी शेखर पाटील यांचे स्वागत करण्यात आले. सदरील पोलीस चौकी कोळदा ते सेंधवा या मुख्य मार्गावरील सुमारे ५००० लोकसंख्याने असलेले रायखेड गाव असून या पोलीस चौकीअंतर्गत परिसरातील सुमारे १७ गावांच्या समावेश करण्यात आला आहे, या पोलीस चौकीत एकूण शासन स्तरावरून पाच पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले आहे.

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
हे देखील वाचा:
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
त्यात सुनील पाडवी, जितेंद्र पाडवी, अजित गावित, राकेश पावरा, प्रल्हाद राठोड, आधी पोलीस कर्मचारी येथे हजर राहतील, मध्यप्रदेश सीमा लगत असलेले रायखेड गावातील पोलीस चौकी असून परिसरात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये तसेच अवैध प्रकारे व्यवसाय करणाऱ्यावर वचक बसणार व बुरट्या चोरांना ही धाक निर्माण होईल यासाठी म्हसावद येथील पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शना खाली उत्तम कामगिरी करणार अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.
- Nandurbar Astamba Yatra:अस्तंबा यात्रेदरम्यान दुर्दैवी दुर्घटना; ४००० फूट दरीत कोसळून भाविकाचा मृत्यू, ५ दिवसानंतर मृतदेहाचा शोध
- Nandurbar News : अक्कलकुव्यात रात्रीच्या अंधारात दगडफेक; २५ दिवसांपासून नागरिक दहशतीत…!
- Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील ७ हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित; चौथ्या यादीत अवघ्या ४२३ जणांचा समावेश..!
- Thane News Dombivli Sangeet Bhajanotsav Competition: डोंबिवलीत २४ व २५ ऑक्टोबरला भव्य संगीत भजनोत्सव स्पर्धा!
- Nandurbar News MLA Chandrakant Raghuvanshi MSEDCL: दुष्काळात शेतकऱ्यांना ६ तास अखंड वीज द्या; आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी..!
सदरील दूरशेत्र पोलीस चौकी इमारती साठी ग्रामपंचायतचे मोठे योगदान आहे. इमारती साठी जागा उपलब्ध करून दिली तसेच व सकारात्मक सहकार्य केल्यामुळे इमारतीच्या परिसरातील झाडांची व गवताची लागवड झाल्याने पोलीस चौकी उठून दिसत आहे. यावेळी महानिरीक बी जी शेखर पाटील यांनी उत्तम कामगिरी बद्दल ग्रामपंचायतिचे व गावकरीचे आभार मानले.तसेंच पोलीस अधीक्षक पी आर पाटील,यांनीही यावेळी आभार मानले. यावेळी पोलीस अधीक्षक पी आर पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक राजन मोरे, सह गावातील व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
✍संजय मोहिते शहादा

