Nandurbar News : पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते रायखेड दूरक्षेत्र  पोलीस चौकी नूतनीकरणाचे उद्घाटन..!

0
132
nandurbar-news-inauguration-of-raikhed-doorkshetra-by-ig

Nandurbar News – शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाणे अंतर्गत येणारे रायखेड येथील दूरशेत्र पोलीस चौकीचे नूतनिकरणचे विशेष पोलीस महानिरीक्षक नासिक परीक्षेत्र बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते नवीन इमारतीचे उठघाट्न करण्यात आले.

सुरुवातीला महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा करून ढोलच्या तालावर नृत्य करीत महानिरीक बी जी शेखर पाटील यांचे स्वागत करण्यात आले. सदरील पोलीस चौकी कोळदा ते सेंधवा या मुख्य मार्गावरील सुमारे ५००० लोकसंख्याने असलेले रायखेड गाव असून या पोलीस चौकीअंतर्गत परिसरातील सुमारे १७ गावांच्या समावेश करण्यात आला आहे, या पोलीस चौकीत एकूण शासन स्तरावरून पाच पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले आहे.

Inauguration of Raikhed Doorkshetra by Inspector General of Police..!

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यात सुनील पाडवी, जितेंद्र पाडवी, अजित गावित, राकेश पावरा, प्रल्हाद राठोड, आधी पोलीस कर्मचारी येथे हजर राहतील, मध्यप्रदेश सीमा लगत असलेले  रायखेड गावातील पोलीस चौकी असून परिसरात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये तसेच अवैध प्रकारे व्यवसाय करणाऱ्यावर वचक बसणार व बुरट्या चोरांना ही धाक निर्माण होईल यासाठी म्हसावद येथील पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शना खाली उत्तम कामगिरी करणार अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

सदरील दूरशेत्र पोलीस चौकी इमारती साठी ग्रामपंचायतचे मोठे योगदान आहे. इमारती साठी जागा उपलब्ध करून दिली तसेच व सकारात्मक सहकार्य केल्यामुळे इमारतीच्या परिसरातील झाडांची व गवताची लागवड झाल्याने पोलीस चौकी उठून दिसत आहे. यावेळी महानिरीक बी जी शेखर पाटील यांनी उत्तम कामगिरी बद्दल ग्रामपंचायतिचे व गावकरीचे आभार मानले.तसेंच पोलीस अधीक्षक पी आर पाटील,यांनीही यावेळी आभार मानले. यावेळी पोलीस अधीक्षक पी आर पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक राजन मोरे, सह गावातील व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

संजय मोहिते शहादा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here