Nandurbar News… प्रकाशा नजीक अपूर्ण कामामुळे महामार्गावर वाढले अपघात… !

0
213

काम पूर्ण न केल्यास आंदोलन करणार ; ग्रामस्थांनी दिला इशारा

शहादा :- तीन राज्यांना जोडणाऱ्या कोळदा ते सेंधवा या महामार्गाचे जवळजवळ पूर्ण होत आहे. मात्र शहादा नजीक करजई ते लांबोळा दरम्यान काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण आहे. त्या अपूर्ण कामामुळे अपघात घडत असून वाहने नादुरुस्ती होत आहेत. अपूर्णावस्थेत रस्ता हा काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यापेक्षा एक फुट खोल झाल्याने याठिकाणी जोरात येणारे वाहन आदळून अपघात होत आहेत. तसेच प्रकाशा बसस्थानक ते केदारेश्वर मंदिर या दरम्यान शाळेजवळ गतिरोधक बसवण्याची मागणी प्रकाशा ग्रामस्थ शेतकरी वर्ग, पालक वर्ग, भाविक आदींनी केली आहे. येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

35c11fa0 1aa4 4979 97df be0feed5ec26

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात रंगणार “खासदार चषक” क्रीडा महोत्सव…. खा.हिना गावितांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठानतर्फे क्रीडा सप्ताह ! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW

कोळादा ते शेंधवा हा महामार्ग जवळपास पूर्णत्वास येत आहे. त्याअंतर्गत प्रकाशा ते शहादा दरम्यान करजई ते लांबोळा या दोघां गावामध्ये एका ठिकाणी काम अपूर्ण ठेवले आहे. त्या ठिकाणी टोल नाका येत असल्याची चर्चा आहे. मात्र त्या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून काँक्रिटी रोड व राहिलेले काम याच्यामध्ये मोठा अंतर झाले आहे. आता अपूर्ण कामाच्या ठिकाणी पावसाळ्यात चिखल होईल, पाण्याचे डाके साचले जातील, यात मोटरसायकल स्लीप होऊन अपघात घडतील, म्हणून हे काम त्वरित करावे अन्यथा एवढ्या जागेवर डांबर टाकून वाहन सुरळीत जाईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी प्रकाशा, डांबरखेडा, करजर्ई, बुपकरी,लांबोळा येथील ग्रामस्थ व शेतकरी वर्ग, वाहन चालक यांच्याकडून होत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

प्रकाशा – तोरणमाळ हा नवीन रस्ता करण्यात आला. त्याअंतर्गत केदारेश्वर तापीनदी पूल ते म्हसावद पर्यंतचा मार्ग जवळपास पूर्ण झालेला आहे. मात्र या रस्त्यावर काही ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आलेत, काही ठिकाणी राहिले आहेत. मात्र वेळोवेळी मागणी करून, निवेदन देऊन देखील गतिरोधक बसवण्यात आले नाहीत. प्रकाशा बसस्थानक ते केदारेश्वर मंदिर यादरम्यान जिल्हा परिषद शाळा, सर्वोदय शाळा, आश्रम जवळ, शासकीय दवाखान्याजवळ, केदारेश्वर मंदिर वळण जवळ आदी ठिकाणी वेळोवेळी गतिरोधकची मागणी केली. मात्र गतिरोधक टाकण्यात आलेले नाहीत. कोळदा ते सेंधवा या मार्गावर प्रकाशात तापीनदी पूल ते तळोदा चौफुली या दरम्यान देखील काम आपूर्ण आहे. त्यामुळे नंदुरबार कडून येणारी वाहने या रस्त्यावरून न जाता केदारेश्वर कडून येतात. म्हणून या रस्त्याची रेलचेल वाढली आहे. अवजड वाढणे मोठ्या प्रमाणावर ये – जा करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील विद्यार्थी यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये, म्हणून गतिरोधक टाकण्याची मागणी प्रकाशा ग्रामस्थनी केली आहे. तसेच तापी नदीच्या पुलावर कठडे गेल्या चार वर्षापासून तुटले आहेत.भविष्यात या ठिकाणाहून थेट पाण्यामध्ये वाहन जाऊ शकतो. ते घडू नये म्हणून येथे संरक्षण कठडे बसवण्याची मागणी होत आहे.

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात रंगणार “खासदार चषक” क्रीडा महोत्सव…. खा.हिना गावितांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठानतर्फे क्रीडा सप्ताह ! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

अन्यथा आम्ही आंदोलन करू… जिल्हा सदस्य हरी दत्तू पाटील यांचा इशारा

कोळदा ते सेंधवा या मार्गावर करजई लांबोळ्या दरम्यान एका ठिकाणी काम अपूर्ण सोडले आहे. ते काम पाच वर्षापासून अपूर्ण आहे. मेन काँक्रिटीकरण व राहिलेलं काम यांच्यामध्ये मोठा फरक आहे. लोकांना शारीरिक व्याधींसह वाहने नादुरुस्त होत आहेत. आठ दिवसात या ठिकाणी डांबरीकरण न केल्यास आंदोलन करण्यात येईल. तसेच प्रकाशा येथील शाळेजवळ, दवाखान्याजवळ, आश्रम जवळ, गतिरोधक बसवण्याची मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे. निवेदने दिले आहे. जर या ठिकाणी काम झाले नाही तर आम्ही प्रकाशा शेतकरी, पालक,भक्तगण रस्ता रोको करणार व आंदोलनही करणार, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य हरी पाटील यांनी दिला आहे.

नरेंद्र गुरव. एमडी.टीव्ही. न्युज, प्रकाशा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here