Nandurbar News : नंदुरबार रुग्णालयात बिबट्या घुसल्याने रुग्ण आणि कर्मचारी दहशतग्रस्त leopard entered in Nandurbar Hospital

0
237
leopard entered in Nandurbar Hospital

Nandurbar News: नंदुरबार येथील रुग्णालयात बिबट्या घुसल्याने रुग्ण आणि कर्मचारी दहशतग्रस्त झाले. नंदुरबार तालुक्यातील एका रुग्णालयात मंगळवारी बिबट्या शिरला. बिबट्याचे दर्शन होताच रुग्णालयातील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

रुग्णालयात बिबट्या इकडे तिकडे फिरत होता. मात्र, यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. या प्रकरणाची माहिती विभागाला देण्यात आली. यानंतर बिबट्याला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले.

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा (Shahada) शहरातील डोंगरगाव रोडवर असलेल्या आदित्य मॅटर्निटी अँड आय हॉस्पिटलमध्ये बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे.

रूग्णालयात बिबट्या दिसल्याची माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना मिळताच ते मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा बिबट्या रात्री रुग्णालयात दाखल झाला असावा.

मंगळवारी सकाळी हॉस्पिटलच्या आवारात साफसफाईचे काम सुरू असताना हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यातून एका सफाई कर्मचाऱ्याला गुरगुरण्याचा आवाज आला. नंतर कोपऱ्यात बिबट्या बसल्याचे कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांना कळवले, त्यांनी तातडीने मागील दरवाजा बंद करून बिबट्याला पकडण्यात यश मिळविले.

त्यानंतर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. रुग्णालयातून फोन आल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले.

रुग्णालयात बिबट्याचा वावर असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयातील अनेक रुग्णांना त्रास झाला. काही रुग्णांनी रुग्णालय सोडून जाण्याचा निर्णय घेतला.

वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले. या घटनेमुळे शहादा शहरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here