Nandurbar News – चिमठाणे साळवे फाटयावरील क्रांतीस्मारक येथे आज महाविकास आघाडीच्या पदाधिकारींवर तालुक्यात खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार थांबले पाहिजेत या उद्देशाने विरोधी गटाचे क्रांती स्मारका जवळ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून देश भक्तांनी इंग्रजांच्या विरोधात लढतांना याच ठिकाणी धुळे जिल्ह्यातील स्वातंत्र सैनिकांनी इंग्रजांचा खजिना लुटून क्रांती ची मशाल पेटवली होती.
त्यांच क्रांती स्मारका जवळ महा विकास आघाडीच्या नेत्यांचे आत्मक्लेश आंदोलन म्हणजे तालुक्यात नवी क्रांती घडवण्याचा उद्देश तर नाही ना?यासाठी आत्मक्लेश आंदोलन करतांना क्रांती स्मारकाची निवड केली त्याकाळी स्वातंत्र्य सैनिक देशासाठी लढले होते आता महा विकास आघाडीचे नेते तालुक्यासाठी लढत आहेत का? आता मुद्दा देशाचा नाही तर तालुक्यात होत असलेले खोट्या गुन्ह्याचा आहे असे खोटे गुन्हे दाखल का? होतात तेही गंभीर स्वरूपाचे जसे दरोडा कलम ३९५,ठार मारण्याचा उद्देश कलम ३०७ असे गंभीर गुन्हे राजकीय दबावाखाली होतात कसे? असा आरोप विरोधकांचा आहे.
(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नुकताच चिमठाणा, मेथी गटाचा निकाल लागला आणि चिमठाणा व मेथी गटातील मांडळ याठिकाणी भांडण होऊन हणामारी झाली. तसा शिंदखेडा, दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्यात कलम ३०७,३९५ असे गंभीर कलम लावले आहेत या कलम चा अर्थ दरोडा व मृत्यू होईल अशी जबरी मारहाण झाली तशी फिर्याद झाली परंतु फिर्याद ची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय झाला. आता गुन्हा खरा की खोटा हे न्यायालय ठरवते गुन्हा खरा असेल तर शिक्षा झालीच पाहिजे परंतु खोटा ठरवला तर गुन्हे दाखल करण्याऱ्या अधिकाऱ्यांचे काय? त्याच्यावर कार्यवाही होईल का? आजपर्यंत असे झाले नाही.
म्हणून तर आत्मक्लेश आंदोलन करण्याची वेळ विरोधकांवर आली. नुकताच चिमठाणा, मेथी गटाचा निकाल लागला पोट निवडणूक होती कार्यकर्तेंनी एकमेकांचा प्रचार केला मतदान प्रक्रिया पार पडली निकाल लागला निवडून आलेल्या उमेदवारांनी मिरवणूक काढली सर्वांनी आनंद साजरा केला आणि दुसऱ्याच दिवशी भांडण होतो. भांडण करणारे कुणी बाहेरचे नाही तर एकाच गावातील शेजारी पाजारी राहणारे नेहमी एकमेकांच्या सुखा: दुखात धावून येणारे मित्र तर काही भाऊबंदकी असणारे जवळचे नातेवाईक आहेत एकाच गावात जवळ – जवळ राहणारे खरच दरोडा टाकतील का? घरात घुसून लुटमार करुन नेतील का? जर त्यांना दरोडाच टाकायचा होता तर निवडणूका आधीच टाकला असता निवडणूक होण्याची वाट का? बघितली असती त्यांना ठार मारायचाच उद्देश असता तर मतदानाच्या आधीच मारले असते. म्हणून हा प्रकार राजकीय हेतूनेच खोटा गुन्हा असल्याचा दावा विरोधी पक्ष नेत्यांचा आहे.
एखादी फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल झाली तर ती फिर्याद कुठल्या आधारे झाली त्याचा खुलासा तपास अधिकारींना कोर्टात करावा लागतो फिर्याद खोटी का? खरी हे न्यायालयात सिद्ध होतेच परंतु त्यावेळी पुरावा लागतो पुरावा मिळाला नाही तर निर्दोष मुक्तता होते. परंतु गुन्हा दाखल झाला म्हणजे पोलीस ठाण्यात गुन्हेगारा सारखी वागणूक मिळते नाहक त्रास सहन करावा लागतो. जामीन घ्या वकील लावा आर्थिक नुकसान सामाजिक बदनामी मानसिक छळ निकाल लागेपर्यंत सहन करावा लागतो. असा अन्याय व त्रास सामान्य कार्यकर्ताला होऊ नये म्हणून क्रांती स्मारकापासून आत्मक्लेश आंदोलनाची सुरुवात केली असली तरी या आंदोलनातून खरच खोटे गुन्हे दाखल करण्याचे थांबतील का
(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आमदार जयकुमार रावळ सत्तेचा दुरुपयोग करून शिंदखेडा तालुक्यातील विरोधी पक्षाचे कार्यकर्ते व सामान्य लोकांवर भा.द.वि.च्या कलम 395 (दरोडेखोरी) या कलमाचा सर्रास वापर करून छळीत आहेत त्याच्या निषेधार्थ जनसामान्यांचे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले त्या प्रसंगी
डॉ हेंमतराव देशमुख माजी कामगार राज्यमंत्री शामकांत सनेर जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्ष
हेमंत साळुंखे शिवसेना जिल्हाप्रमुख धुळे ग्रामिण ललित वारुडे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शानाभाऊ सोनवणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख धुळे ग्रामिण बापुसाहेब रविंद्र देशमुख मा.नगराध्यक्ष दोंडाईचा रावसाहेब पवार तालुकाध्यक्ष काँग्रेस गिरिष देसले तालुकाध्यक्ष शिवसेना शिंदखेडा अमित दादा पाटिल राहुल माणिक रतिलाल पाटिल राजेंद्र देवरे पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटिल मा.सरपंच डोंगरगाव विरेंद्र झालसे सरपंच कलमाडी भैय्या माळी मेथी नाजिम दादा शेख मा.नगरसेवक भुपेंद्र धनगर मा.नगरसेवक राजु देशमुख (जाबाज) नरेंद्र पाटिल मा. सरपंच चिमठाणे गणेश परदेशी शैलेश सोनार शिवसेना उपतालुकाप्रमुख बापु महाजन मा. सरपंच रामी महेंद्र पाटिल सर दिपक आहिरे मा.नगरसेवक अशोक सोनवणे नितिन देसले वकिल भदाणे चिराग माळी मुरलीधर माळी जिभाऊ माळी विलास गोसावी माधवराव देवरे कैलास आखाडे सरपंच मांडळ युवराज देवरे गोपाल कोळी राकेश पाटिल रवि बापु पाटिल व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.