नंदुरबारमध्ये भेसळयुक्त दूध निर्मितीला आळा, १०१ लिटर दूध नष्ट | Nandurbar News Production of adulterated milk stopped

0
670
Production of adulterated milk stopped

Nandurbar News : जिल्ह्यात भेसळयुक्त दूध निर्मितीवर जिल्हास्तरीय दूध भेसळ नियंत्रण समितीने मोठी कारवाई केली आहे. समितीच्या पथकाने जिल्ह्यातील विविध भागात दुधाची तपासणी केली असता १०१ लिटर भेसळयुक्त दूध आढळून आले. हे दूध नष्ट करण्यात आले आहे.

नंदुरबार शहरी भागातील देसाईपुरा, राजपुत पेट्रोल पंप, कोकणी हिल, संजय नगर, अंधारे स्टॉप आदी परिसरात दुधाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ९ दूध विक्रेत्यांच्या दुधात भेसळ आढळून आली. या दूधात पाणी, अनैसर्गिक वास, चव, कचरा आणि अस्वच्छता आढळली.

download

जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी सांगितले की, भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. यामुळे भेसळ करणाऱ्या विरोधात भविष्यात दंडनीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या कारवाईत अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष धनंजय गोगटे, अपर पोलिस अधिक्षक नीलेश तांबे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. मनोज पावरा नंदुरबार यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित रमेश पाटील, सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन डी. डी. तांबोळी, क्षेत्रसहायक वैध मापनशास्त्र एस. वी. सोनवणे, विस्तार संकलन प्रीतेश गोंधळी, मुकेश तमायचेकर, विजय भदाणे यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here