Nandurbar News Today : धक्कादायक ! फेसबुक आणि व्हाट्सअपद्वारे ६७ लाखांचा गंडा घातला…!

0
52
nandurbar-news-today-67-lakhs-cheated-through-facebook-and-whatsapp

Nandurbar News Today – फेसबुक आणि व्हाट्सअपवर गुंतवणुकीच्या आमिषाने नंदुरबारमधील एका हॉटेल मालकाला ६७ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खापर शहरातील नारायणदादानगर येथील राहणारे हॉटेल मालक नासीर लुकमन खान (वय ५६) हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत.

गुन्हा दाखल, सायबर पोलिसांकडून तपास सुरू:

या प्रकरणी नासीर लुकमन खान यांनी नंदुरबार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, व्हाट्सअप आणि फेसबुकवर गुंतवणुकीच्या आमिषाने अनेक ग्रुप तयार करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल, असे खोटे आश्वासन देण्यात येत होते.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

मणक्याच्या आजारामुळे फसवणुकीच्या जाळ्यात:

मणक्याच्या आजारामुळे घरीच असलेले नासीर लुकमन खान हे या व्हाट्सअप आणि फेसबुक ग्रुपमध्ये सामील झाले. ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मिळणाऱ्या मोठ्या परताव्याने ते आकर्षित झाले आणि हळूहळू लाखो रुपये गुंतवू लागले.(Nandurbar News Today)

एडमिनने खोटी माहिती पसरवून फसवणूक केली:

ग्रुपचे ॲडमिन रक्कम जमा होत असल्याची खोटी माहिती ग्रुपवर टाकत राहिले. यामुळे नासीर लुकमन यांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळत राहिले.

एक वर्षात ६७ लाखांची फसवणूक:

१ जानेवारी २०२४ ते ११ जून २०२४ या कालावधीत नासीर लुकमन यांनी वेळोवेळी ६७ लाख १ हजार रुपये गुंतवले. मात्र, गुंतवणुकीचा परतावा मिळाल्यास काहीही घडले नाही.

गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू:

या फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर नासीर लुकमन यांनी नंदुरबार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, श्रीया अकेला, अनुराग ठाकूर आणि रोनक नावाच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सायबर पोलिस या तिघांचा शोध घेत आहेत.

फेसबुक आणि व्हाट्सअपवरून गुंतवणुकीच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.

एम डी टीव्ही न्यूज नेटवर्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here