Nandurbar News Today : आशा,गटप्रवर्तक मोबदला वाढ निर्णय घ्या ; मुख्यमंत्रीच्या वाढदिवशी आशा, गटप्रवर्तक भेटून साकडे घालणार..!

0
76
Asha, group promoters decide to increase remuneration Nandurbar news today

Nandurbar News Today – आरोग्य विभागात कार्यरत आशा गटप्रवर्तक यांचा राज्यव्यापी संप 12 जानेवारीपासून सुरू असून मा. आरोग्य मंत्री महोदयांनी व माननीय प्रधान सचिव यांनी दिवाळी बोनस व मानधन वाढ तीन महिन्यापूर्वी जाहीर केली आहे .त्याबाबतचे आदेश शासन प्रशासनाने काढलेला नाही.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी सातत्याने आंदोलन राज्यभर आशा, गटप्रवर्तक करत असून  कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय न झाल्याने ठाणे येथे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी गुरुवारी 9  फेब्रुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यातील आशा,गटप्रवर्तक येऊन मुख्यमंत्री मोबदला वाढ घोषणा करेपर्यंत तिथेच थांबतील व मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या दिवशी कृती समिती याबाबत साकडे घालणार असल्याचे निवेदन तळोदा येथे आशा,गटप्रवर्तकांकडून तळोदा येथे तालुका वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

Asha, group promoters decide to increase remuneration Nandurbar news today

तालुक्यातून मोठ्या संख्येने आशा,गट प्रवर्तक ठाण्याकडे रवाना झाले असून दिवाळी भेट दोन हजार रुपये  देण्यात यावी ,अशा स्वयंसेवकांच्या मोबदल्यात 7000 ची वाढ, गटप्रवर्तकांच्या  मोबदल्यात 10000 ची वाढ,गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या यासह आदी मागण्यांबरोबरच  संघटनेचे  राज्य अध्यक्ष काँ राजू देसले यांना पंतप्रधान दौरा नाशिक वेळी पंचवटी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी अमानवीय वागणूक दिली व पोलीस कोठडीत  ठेवले याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी दिनांक 9 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.तसेच कृती समितीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालण्यात येणार आहे.

Asha, group promoters decide to increase remuneration

महेंद्र सूर्यवंशी – तळोदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here