आष्टे ता. नंदुरबार ( Nandurbar News Today ) दि ०३/०२/२०२४ रोजी मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत आष्टे केंद्राची क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेचे उदघाटक तथा अध्यक्षस्थानी सतीश चौधरी प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प. नंदुरबार उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून देवमन पवार जि.प.सदस्य, प्रल्हाद राठोड माजी उपसभापती व सदस्य पं.स.नंदुरबार,कमलेश महाले माजी उपसभापती व सदस्य पं.स.नंदुरबार,वंदना वळवी प्राथ.उप शिक्षणाधिकारी जि.प.नंदुरबार, लक्ष्मण सूर्यवंशी सरपंच नांदर्खे, भरत साबळे,सामाजिक कार्यकर्ते,नारायण ढोडरे मा.अध्यक्ष शा.व्य समिती आष्टे, हिरामण राठोड उपसरपंच नांदर्खे,एस.एन.पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी आष्टे बीट,जुबेर तांबोळी,केंद्रप्रमुख आष्टे केंद्र,विशाल पाटील अध्यक्ष प्रगती विद्या प्रसारक संस्था नांदर्खे,प्राप्ती पाटील,उपाध्यक्ष प्रगती विद्या प्रसारक संस्था नांदर्खे,अनिल पाटील पदो.मुख्याध्यापक,मीराबाई गवळी,केंद्र मुख्याध्यापक,उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रवेशद्वारापासून मुलांनी लेझीम द्वारे स्वागत केले.
त्यानंतर उपशिक्षणाधिकारी यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची फीत कापली.नंतर प्रतिमा पूजन व दीप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर मान्यवर यांनी मनोगते व्यक्त केली.त्यात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव व सर्वांगीण विकास होईल व भविष्याचे उत्तम खेळाडू आपणाला मिळतील.त्यानंतर मैदानावर मान्यवर व विद्यार्थ्याच्या हस्ते मशाल पेटवून धावणे स्पर्धा सुरू करण्यात आली.
आजच्या या क्रिडा स्पर्धेत आष्टे केंद्राच्या जि.प.व खाजगी अश्या १४ शाळांनी सहभाग घेतला. व खो-खो,कबड्डी, लिंबू चमचा,१०० मीटर धावणे,लांब उडी,गोणपाट अश्या मुले आणि मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धा संपल्यावर सर्व विजेते संघांना पारितोषिक, प्रमाणपत्र व मेडल देऊन गुणगौरव केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल पाटील शिक्षक,अजेपूर व मनोज पाटील शिक्षक,आश्रम नांदर्खे व आभार प्रदर्शन ललित पाटील,शिक्षक आश्रम नांदर्खे यांनी केले तर विशेष सहकार्य आष्टे केंद्र क्रीडा समिती ,आष्टे केंद्राचे व आश्रम नांदर्खे शाळेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी केले.
प्रतिनिधी – नारायण ढोडरे ग्रामीण नंदुरबार