Nandurbar News Today : भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या गाडीचा अपघात…!

0
236
BJP state general minister Vijay Chaudhary's car accident

Nandurbar News Today – भाजपा प्रदेश महामंत्री मा. विजय चौधरी यांच्या गाडीला आज सकाळी अपघात झाला. हा अपघात चिमठाणा चौफुलीच्या पुढे जनता हायस्कूलजवळील गतीरोधक ओलांडताना झाला. समोरून येणाऱ्या रेतीच्या डंपरने (क्रमांक MH 18 BG 2348) चौधरी यांच्या गाडीला धडक दिली.

सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु चौधरी आणि त्यांच्यासोबत असलेल्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

घटनास्थळी चिमठाणा पोलीस चौकी आणि शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस त्वरित दाखल झाले. डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे आणि पुढील तपास शिंदखेडा पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी करत आहेत.

Nandurbar News Today BJP state general minister Vijay Chaudhary's car accident

या अपघातामुळे भाजपा पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चौधरी हे पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि ते अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. त्यांच्या दुखापतीमुळे पक्षावर काही परिणाम होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here