Nandurbar News Today : महाराष्ट्र बँकेच्या तळोदा,  जिल्हा नंदुरबार मध्ये शुभारंभ, राजेश पाडवी यांच्या हस्ते उदघाटन..

0
282
Launch of Bank of Maharashtra in Taloda Nandurbar News Today

Nandurbar News Today – महाराष्ट्र बँकेच्या २४०६ व्या शाखेचे उद्घाटन व शुभारंभ आज रोजी आमदार मा. श्री. राजेश दादा पाडवी  यांच्या हस्ते करण्यात आले  तर दीप प्रज्वलंन श्री. प्रवीण कुमार सिंह,आंचलीक व्यवस्थापक, जळगांव झोन, नगराध्यक्ष श्री. अजय परदेशी व जिल्हाअध्यक्ष गौरव वाणी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री. प्रवीण कुमार सिंह, आंचलीक व्यवस्थापक, व नवीन शाखेचे शाखा प्रबंधक श्री. ललित झाडे यांच्यासह उद्योजक  व महाराष्ट्र बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी शहरातील व्यापारी, नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार मा. श्री. राजेश दादा पाडवी यांनी सर्वांशी संवाद साधत असताना बँक शासनास   पुर्विच्या विविध सुविधाबबाबत तसेच बँक ऑफ महाराष्ट्र चे बचत गट कर्ज वाटप, विविध शासन स्तर योजना मधील कामकाजबद्दल प्रशंसा केली व बँक ऑफ महाराष्ट्र सोबत असलेला वैयक्तिक अनुभव त्यांनी सांगितला. ( Nandurbar News Today )

तसेच तळोदा तालुका मध्ये बँकाना असणाऱ्या विविध उद्योग संधी, शासन पुरस्कृत योजना बाबत मार्गदर्शन केले.  बँक अर्थ सहाय्य व आर्थिक साक्षरता यांचा सर्वसामान्य ग्राहकाना फायदा होईल व तळोदा शहराचा आर्थिक स्तर उंचावन्यास बँक ऑफ महाराष्ट्र च्या नवीन शाखेचि मदत होईल. तसेच, शासनाचे महत्त्वा‍कांक्षी आकांक्षित जिल्हा नंदुरबार मध्ये नवीन बँक शाखांचा विस्तार करायचे शासनाचे उद्धीष्ट साध्य करण्यात  हातभार लागेल. असे मात त्यांनी व्यक्त केले.

प्रशासन बँक ऑफ महाराष्ट्र ला व्यवसाय वृद्धी करीता सर्वतोपारी मदत करेल असे आश्वासन दिले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आंचलीक व्यवस्थापक श्री प्रवीण कुमार सिंह म्हणाले की, आमच्या सर्व ग्राहकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छामुळे आज महाराष्ट्र बँकेच्या नंदुरबार  जिल्ह्यात ११ व्या तळोदा शाखेची सुरवात झाली आहे. पूर्ण जळगांव क्षेत्रात एकूण ४३ शाखा आहेत. भारतातील २४०६ व्या शाखेची सुरवात आज तळोदा शहरात झाली.या सर्वात आमचे अधिकारी कर्मचारी व येथे उपस्थित शासकीय कर्मचारी, ग्राहक यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले तसेच केंद्र शासन पुरसकृत  योजना व उद्योजक ग्राहक वर्गासाठी महास्वागतम व इतर योजनांबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

तळोदा मधील ग्राहकांसाठी लागणाऱ्या विशिष्ट बँकिंग गरजा, शासन पुरस्कृत योजना मध्ये लागणाऱ्या विविध सुविधा या शाखे द्वारे पुरविण्यात येतील. तसेच कार्यक्रमात जमलेल्या सर्व ग्राहकांनी  जास्तीत जास्त बँकिंग सुविधाचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी अंशिता कुलकर्णी तर आभार प्रदर्शन जयेश खुमान यांनी केले. हा कार्यक्रम शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करत संपन्न झाला.

महेंद्र सूर्यवंशी तळोदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here