Nandurbar News Today : सारंगखेडा येथे  रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त भव्य पदयात्रा..!

0
207
Padayatra-on-the-occasion-of-Ramlalla-Pranpratistha-at-Sarangkheda

Nandurbar News Today – सारंगखेडा येथील सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रामजन्मभूमी मंदिर उद्घाटन व रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री राम दरबाराची जिवंत प्रतिकृती साकारली.

सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल, सारंगखेडा ( Sarangkheda ) येथे प्रभू श्री राम यांच्या अयोध्या ( Ayodhya ) येथील रामजन्मभूमी भव्य मंदिर उद्घाटन व रामलल्ला ( RamLalla ) प्राणप्रतिष्ठा ( Ram Mandir Pran Pratishta ) निमित्ताने भव्य पदयात्रा आयोजन

आज दिनांक 20/01/2024 वार शनिवार रोजी सनराईज स्कूल सारंगखेडा येथे प्रभू श्री राम यांच्या अयोध्या येथील रामजन्मभूमी भव्य मंदिर उद्घाटन व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भव्य पदयात्रा चे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदू धर्माचे आराध्य प्रभू श्री राम दरबार याची जिवंत प्रतिकृती साकारली.( Nandurbar News Today )

Grand Padayatra organized on the occasion of Ramlalla Pranpratistha at Sarangkheda

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

सदर पदयात्रा आयोजनाने संपूर्ण परिसर हा प्रभू श्रीराम यांच्या जयघोषाने व गजराने दुमदुमून गेला. गावातील घरा घरातील महिलांनी प्रभू श्री रामचंद्र, माता सीता, भ्राता लक्ष्मण व हनुमान याचे जागोजागी पूजन केले. सदर कार्यक्रम यशवितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने शर्तीचे प्रयत्न केले. सदर कार्यक्रम हा संस्था अध्यक्षा सौ ऐश्वर्या जयपालसिंग रावल व संस्था अध्यक्ष श्री जयपालसिंग रावल यांच्या प्रेरणेने तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रवीण पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

Padayatra organized on the occasion of Ramlalla Pranpratistha at Sarangkheda

प्रतिनिधी – गणेश कुवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here