Nandurbar News Today : डॉ.टाटियालिखित ‘निझरा नाल्यातील रक्तरंजित हत्याकांड’ पुस्तकाचे प्रकाशन

0
180
Nandurbar News Today taloda book

Nandurbar News Today – तालुक्यातील रावलापाणीसंग्रामावर आधारित सामाजिक कार्यकर्ते डॉ कांतीलाल टाटिया लिखित निझरा नाल्यातील रक्तरंजित हत्याकांड या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

रंजनपुर (मोरवड) ता तळोदा येथें पार पडलेल्या या कार्यक्रमात आप की जय संप्रदायाचे उत्तराधिकारी चंद्रसेन महाराज, पुस्तकाचे लेखक डॉ कांतीलाल टाटिया माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी,प्रेम पाडवी परेश पाडवी,नारायण ठाकरे आदिसह आपकी जय परिवारातील कारभारी व कुटुंबीय उपस्थित होते.त्यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

Nandurbar News Today

या पुस्तकात रावलापाणी स्वातंत्र्यसंग्रामाची पूर्वपिठीका,तोडोफोडो नीतीच्या अवलंब, निमाड प्रांतातील हद्दपारिचे दिवस, रावलापाणीचा प्रत्यक्ष संग्राम,ब्रिटिश प्रशासनाची तयारी,2 मार्च काळा दिवस, गोळीबारानंतरची परिस्थिती,अटकेनंतरचे काव्य, रक्तरंजित घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार व चौकशीतील जबाब,आदी बाबींची पुरावांशी मांडणी करण्यात आली आहे.

Nandurbar News Today taloda book

याप्रसंगी बोलताना पुस्तकाचे लेखक डॉ. टाटिया यांनी पुस्तकाच्या आशय संदर्भात माहिती दिली यावेळी ते म्हणाले की रावला पाणीच्या स्वतंत्र्यसंग्राम हा जालियनवाला बाग हत्याकांडा पेक्षाही भयावह होता मात्र इतिहासात नोंद असल्यामुळे हा स्वातंत्र्यसंग्राम दुर्लक्षित राहिला याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी शासन- प्रशासन दरबारी पाठपुरावा करणे गरजेचे आहे अशा पुस्तकाच्या माध्यमातून रावलापाणीच्या दुर्लक्षित स्वातंत्र्यसंग्रामाचे दस्तऐवजीकरण करून पुढच्या पिढीपर्यंत क्रांतिकारकांच्या प्रेरणादायी वारसा पुराव्यासह पोहोचवण्याच्या प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान रावलापाणी स्वातंत्र्यसंग्राम पुस्तकाची दुसरी आवृत्ती देखील लवकर प्रकाशित होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली कार्यक्रमाला संख्याने आप धर्म परिवाराचे पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.महेंद्र सूर्यवंशी तळोदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here