नंदुरबार : विहिरीतून गाळ काढताना एकाचा मृत्यू

0
402

मांजरे येथील घटना ; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नंदुरबार : तालुक्यातील मांजरे शिवारातील विहिरीतून क्रेनच्या सहाय्याने गाळ वर काढीत असतांना क्रेन चालकाच्या हलगर्जीपणामुळे गाळातील दगड डोक्यावर पडून दुखापत झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी एकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील मांजरे शिवारातील शेतात विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरु होते. यावेळी मदन चंद्राजी रेगर (वय ३५, रा.राशेड ता.कोठडी जि.भिलवाडा राजस्थान) यांनी त्यांच्या डोक्यावर हेल्मेट न घालता गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरले. क्रेन चालक छोटूलाल चंद्राजी रेगर याने गाळ काढण्यासाठी शिकाई विहिरीत उतरविली होती. शिकाई खालून गाळ भरुन वर येत असतांना क्रेन चालक छोटूलाल रेगर याच्याकडून हलगर्जी व निष्काळजीपणाने क्रेन हलल्याने त्यात भरलेल्या गाळातील दगड मदन रेगर यांच्या डोक्यावर पडून तो गंभीर जखमी झाला होता.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

त्यास तातडीने दवाखान्यात हलविले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत प्रभूलाल नथ्थूजी खाटीक यांच्या फिर्यादीवरुन नंदुराबार तालुका पोलिस ठाण्यात छोटूलाल रेगर याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना.गुलाबसिंग वसावे करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here