खासदार हिना गावित यांचे प्रयत्न ; शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार
नंदूरबार :- नंदुरबारसह धुळे जिल्ह्यात कडधान्य, कापूस, फळपिके यासह कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात कांद्याची लागवड करीत असतात. मात्र योग्य भावाअभावी कांदा हा नेहमी शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणत असल्याचा अनुवभ दरवर्षीचा आहे. भरघोस खर्च करून कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. यावर योग्य मार्ग काढण्यासाठी खा.डॉ.हिना गावित यांच्या प्रयत्नाने सोमेश्वर मार्केटची स्थापना करून नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील कांदा थेट रेल्वेने आता जम्मूकाश्मीर येथे पाठवण्यात येत आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
जम्मू काश्मीर येथे कांद्याची पहिली खेप ८०० टनाची पाठवण्यात आली असून कांद्याला प्रतिक्विंटल ८०० रुपये भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला बाहेर राज्यात चांगला भाव मिळत असल्याने चांगला मोबदला मिळणार असल्याच्या आशा उंचावल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातून पहिल्यांदा रेल्वेने दुसऱ्या राज्यात कांदा निर्यात केला जात आहे. येणाऱ्या काळात नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या कांदा हा बांगलादेश येथे पाठवण्याची देखील व्यवस्था करण्यात येत आहे. नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या कांदा दुसऱ्या राज्यात आणि देशात गेल्याने याच्या फायदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांना देखील होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, यापुढे देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळणार आहे. कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी ही वेगवेगळे उद्योगांना चालना देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असं खा.डॉ. हिना गावित यांनी यावेळी सांगितला आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार.