NANDURBAR POLICE: पोलीस दलाने श्रमदानातून केले बंद गाळे मोकळे ..

0
567

पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांची होती संकल्पना ..

तळोदा /नंदुरबार -२१/७/२३

तळोदा तालुक्यातील लोभानी फाटा जवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली .. या पुलाचे दोन्ही बाजूला साचलेला गाळ व कचरा पोलीस दलाचा वतीने श्रमदानातून काढण्यात आला ..
पुलाचे खाली गाळ कचरा काढून पुलाचे बंद गाळे मोकळे केल्याने पाण्याच्या प्रवाह मार्ग सुरळीत झाल्याने ही समस्या सुटली आहे .. पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला आहे

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उपविभागीय अधीकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, अक्कलकुवा पो नि बुधवंत, एपीआय अमितकुमार बागुल उपनिरीक्षक सागर गाडी लोहार पो ना अमोल कोळी, रवी कोराळे,व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी आनंदा पाडवी व ग्रामस्थ उपस्थित होते .. पोलीस दलाचा या उपक्रमाने वाहतूक व गावात पाणी शिरण्याची समस्या सुटणार आहे .. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलीस दलाचे आभार व्यक्त केले
पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी बोलताना सांगितले कि
लोभाणी गावाजवळ नाल्यावरती पुल आहे .. पुला खाली कचरा जाऊन गाळ साचल्याने गाळे बंद झाल्याने पावसाच्या पुराचे पाणी हे सातपुड्याच्या डोंगरातून येते .. आजु बाजूच्या गावांमध्ये पाणी शिरते .. पाणी जायला वाट नसल्यामुळे पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होते .. रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुक ठप्प होते .. वाहन काढण्यास अडचण येते.. काही वाहन धारक वाहन काढण्याचे प्रयत्नात वाहून जाण्याची शक्यता निर्माण होते.. त्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होणार नाही म्हणून या गोष्टी लक्षात घेऊन पोलीस दलातर्फे श्रमदानातून या ठिकाणी पुलाचा आजूबाजूला असलेला गाळ कचरा काढण्याचे काम हाती घेतले आहे.. छोट्याशा श्रमदानातून समाज हित जोपासले आहे..
महेंद सूर्यवंशी ,तळोदा शहर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here