नंदुरबार-नवापूर रस्त्यावर तिहेरी अपघातात एक जण ठार

नंदुरबार -७/५/२३

नंदुरबार – नवापूर रस्त्यावरील खामगाव फाट्याजवळ तिहेरी अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली.

ADVERTISEMENT

आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक ( एमएच ३९-७७७८ ) व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नवापूर मोलगी बस क्रमांक ( एमएच ४०-एन ९०२७ ) हिचा भीषण अपघात झाला. त्यात बॅलेनो कंपनीची कार क्रमांक ( एमएच १८-बीआर ५६१४ ) या कारचे देखील नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

यात संदिप वसावे हा युवक गंभीर जखमी झाला आहे तर निकम वसावे या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.हा अपघात इतका भीषण होता की दोघी युवक अपघाता नंतर रस्त्यावर जोरदार आदळ्ल्यानें मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने निकम वसावे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर संदीप हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

मोटर सायकल आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे जखमी झालेल्या युवकाला प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी तात्काळ १०८ ला कॉल करुन बोलावले तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने नंदूरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दोन्ही युवकांची ओळख पटली असून दोन्ही युवक धडगाव तालुक्यांतील अस्तांबा येथील असल्याचे माहिती मिळाली आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here