Nandurbar… अर्हत प्रतिष्ठानतर्फे आयोजित खासदार चषक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन…!

0
242

नंदुरबार :- जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार येथील अर्हत प्रतिष्ठानच्या वतीने २४ ते २९ जून दरम्यान भव्य क्रीडा महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन श्रॉफ हायस्कूल येथील साईबाबा हॉल येथे खा.डॉ.गावित यांच्या हस्ते आज करण्यात आले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात रंगणार “खासदार चषक” क्रीडा महोत्सव…. खा.हिना गावितांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठानतर्फे क्रीडा सप्ताह ! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW

dcb6a51b 8131 43f8 a992 1827a568eb31

दीप प्रज्वलन करून क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी १४ वर्षे वयोगटातील मुले, मुली बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर श्रॉफ हायस्कूलच्या प्राचार्य सौ सुषमा शहा, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुंवर,पत्रकार बाबासाहेब राजपूत, क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे, अर्हत प्रतिष्ठानचे सुभाष पानपाटील, राजेश शहा, डॉ. दिनेश बैसाणे, संतोष शिरसाठ, श्री.त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात रंगणार “खासदार चषक” क्रीडा महोत्सव…. खा.हिना गावितांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठानतर्फे क्रीडा सप्ताह ! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

6402cdf2 56aa 4120 b61b 69826ad37895 1

यावेळी बुद्धिबळ स्पर्धेत उपस्थित स्पर्धक तथा पालक यांना खा.डॉ.हिना गावित यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय जगताप, सिद्धार्थ साळुंके, गौतम पानपाटील, सुलतान मन्सुरी, दीपक बंडीवार, सौरभ साळुंके, सचिन पिंपळे, नंदू पाटील, संदीप खलाणे, हर्षवर्धन बैसाने, जगदीश वंजारी, रामा हटकर, मनीष सनत यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले. आभार कार्यक्रमाचे आयोजक सुभाष पानपाटील यांनी मानले.

एमडीटीव्ही न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here