नंदुरबार :१८/२/२३
शॉर्ट हेडलाईन
1 18 आणि 19 फेब्रुवारी दोन दिवसीय केलं आहे भाविकांसाठी हे प्रदर्शन खुल..
2 ओम शांती परिवारातर्फे करण्यात आला आहे आयोजन
अनेकांना केदारनाथ शिवलिंग दर्शनाचा योग मिळत नाही.. पण तो योग साधून आणलाय प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ओम शांती परिवारानं.. नंदुरबारकरांना घडणार दोन दिवसीय प्रदर्शनातून शिवलिंगाचं दर्शन ..
शहरातील सिंधी कॉलनी भागातील गुरुनानक मंगल कार्यालयात दोन दिवसीय सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत हे प्रदर्शन खुलं केलं आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतंच खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आलं.
सत्यम शिवम सुंदरम चैतन्य केदारनाथ शिवलिंगदर्शनाचे आयोजन या निमित्ताने करण्यात आलंय. नंदनगरीत प्रथमच होणाऱ्या या मेळाव्यानिमित्त भाविकांनी होलोग्रम लेझर शोचा लाभ घ्यावा असा आवाहन आयोजकांनी केलंय.
यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी या परिवाराचा योगदान अतुलनीय आहे.
यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेविका रेश्मा खानवणी उद्योजक मोहन खानवाणी संचालिका विजया दीदी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
होलोग्राम लेझर शोच्या माध्यमातून भाविकांसाठी या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
नंदुरबारकरांनी या संधीचा लाभ घ्यावा. असं आवाहन ओम शांती परिवाराच्या नंदुरबार शाखेतर्फे करण्यात आलंय.
आता खरोखर नंदुरबारकरांना घडणार केदारनाथ शिवलिंगाचं दर्शन..
प्रवीण चव्हाण, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज..