नाशिक -३/६/२३
नाशिकमध्ये लाचखोरीला ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधक हा क्लास वन अधिकारी तब्बल ३० लाखाची लाच घेताना सापडला आहे.
आणि आता नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाची शिक्षणाधिकारी सुनिता धनगर आणि लिपिक नितीन जोशी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. त्यामुळे नाशिकच्या लाचखोरीची राज्यभरात चर्चा होत आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि शिक्षण विभागाचा लिपिक नितीन जोशी यांना लाच घेताना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
तब्बल ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हे दोघे सापडले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून ही मोठी आणि गोपनीय कारवाई करण्यात आली आहे. अधिक चौकशीसाठी धनगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
हे हि वाचा:
भाजपाने आखला मोठा प्लॅन … मुख्यमंत्री शिंदेंचे टेन्शन वाढणार ?
ब्रेकिंग – महाराष्ट्रात पुन्हा तुफान राडा… दगडफेक…. हाणामारी
लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे महापालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एका निलंबित मुख्याध्यापकाला कामावर पुन्हा रुजू करायचे होते. त्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी धनगर आणि जोशी यांनी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
यातील लिपिक जोशी यांनी ५ हजार रुपये स्वीकारले तर ४५ हजार रुपये शिक्षणाधिकारी धनगर यांना स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने पकडले आहे.
तेजस पुराणिक, नाशिक जिल्हा प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज.