Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी घाटात भीषण अपघात..

0
230

नाशिक : १२/७/२३

२२ प्रवाशांसह बस दरीत कोसळली, एकाचा मृत्यू

Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळल्याची माहिती आहे. आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही भीषण बस अपघात झाल्याचं समोर आलं आहे. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी एकाचा मृत्यू झाला, तर बसमधून प्रवास करणारे २२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळल्याची माहिती आहे. आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून गडावरील ४ प्रवासी आहेत. इतर दोघांमध्ये बस चालक व कंडक्टरचा समावेश आहे.बस क्रमांक MH 40 AQ 6259 वर ड्रायव्हर गजानन टपके, कंडक्टर पुरुषोत्तम टिकार कर्तव्यावर होते. अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी झालाय, असे खामगाव आगार सहाय्यक कर्मचारी शुभांगी पवार यांनी सांगितले.

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही : पालकमंत्री दादा भुसे 

पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलताना सांगितलं की, “सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधित यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. जी माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील 18 प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉईंटजवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला. अशी प्राथमिक माहिती आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तशृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना.” 

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here