Nashik Bribe Crime: नाशिक रोडचे पोलीस निरीक्षक गणपत काकड रंगेहात ACBच्या जाळ्यात..

नाशिक -७/७/२३

नाशिक रोडचे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक गणपत महादू काकड यांना 15000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यामुळे नाशिक रोड पोलीस स्टेशन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नासिक रोड पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराला 354 च्या गुन्ह्यात मदत करणार या आश्वासनावर 25 हजाराची लाच काकड यांनी मागितली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.

25 हजाराहून हे डील 15 हजारावर ठरवण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नासिक रोड पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस गणपत काकड यांना पंचांसमक्ष पंधरा हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले.

यासंदर्भात गणपत काकड यांच्यावर गुन्ह्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे. दरम्यान गणपत काकड हे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांचे अतिशय निकटवर्तीय सहकारी मानले जात होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे नाशिक रोड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय नाशिक रोड पोलीस छुप्या पद्धतीने चालणाऱ्या अवैध धंद्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,नाशिक..

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here