Nashik News : संगीताच्या तालावर नाशिककर रंगले चिखलात, अनोख्या मडबाथचे पाहा Photos

0
115

नाशिक -१०/४/२३

नाशिकमध्ये चमरलेण्याच्या पायथ्याशी अनोख्या मडबाथ फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी हनुमान जयंतीनंतर पहिल्या रविवारी हा कार्यक्रम होतो.

8 1
1
9
2
10 1
3
11 1
4

महेशभाई शहा, चिराग शहा तसेच योगगुरुजी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदू देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 26 वर्षांपासून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे नाशिकमध्ये आयोजन केले जाते.

या कार्यक्रमाची महिनाभर आधीपासूनच तयारी केली जाते. जंगलातून वारूळाची माती गोळा केली जाते.ती आठ दिवस आधी भिजववून तिचा रगडा केला जातो. ती माती अंगाला फासून सर्वजण आनंद साजरा करतात.

ही माती संपूर्ण शरीराला लावून आंघोळ केली तर शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते, असा दावा करण्यात येतो.

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व गटातील शेकडो जणांनी या कार्यक्रमाचा संगीताच्या तालावर आनंद लुटला.

यावेळी 25 फूट लांबीचा खास टब तयार करण्यात आला होता. या बाथटबमध्ये चिखल होता.या टबमध्ये 25 ते 30 लोक एकाचवेळी उतरून,अंगाला चिखल लावून बाहेर येत होते.

दोन तास उन्हात उभे राहून चिखल वाळल्यानंतर सर्वजण मित्रमंडळींसह मडबाथचा आनंद लुटत होते.

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here