नाशिक -२१/६/२३
NASHIK NCP PROTEST:शिंदे गटाने केलेल्या बंडाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने [ NCP] नाशिक [NASHIK]शहरात गद्दार दिन साजरा करत खोक्याच्या प्रतिकृती हातात घेत “५० खोके एकदम ओके” अशा घोषणा देत शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जोरदार आंदोलन केले. यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, योगिता आहेर, संजय खैरनार, विष्णुपंत म्हैसधुणे, गौरव गोवर्धने, समीना मेमन उपस्थित होते.
.. ‘50खोके,एकदम ओके‘च्या घोषणांनी शहर दणाणून सोडलं होत ..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
वीस जुन रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह चाळीस आमदार शिवसेनेतून बंडखोरी करित भाजपा ला सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले होते. केवळ सत्तेसाठी नाहीतर पन्नास खोके घेतल्याचा आरोप देखील त्यावेळी करण्यात आला. आपल्या ४० आमदार आणि समर्थक खासदारांना सोबत घेऊन बंड केला आणि मूळ शिवसेनेत फूट पाडली .. त्याला १ वर्ष पूर्ण झाले .. म्हणुन हा दिवस गद्दार दिन साजरा करण्यात आला ..
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS
म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! |
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे[ EKNATH SHINDE] यांनी समर्थक आमदार आणि खासदार यांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केलं होतं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सूरत गाठली. मग गोवा, गुवाहाटी येथून सरकार स्थापन केल. या सर्व घडामोडी घडून आज एक वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने आज राष्ट्रवादीने गद्दार दिन साजरा केला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गद्दारी केली असा आरोप संपूर्ण महाराष्ट्रातील गावागावात होत आहे. त्याचा आधार घेत राष्ट्रवादीने गद्दार दिन साजरा करण्यात आल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी म्हटले आहे.
यावेळी मकरंद सोमवंशी, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, राजाराम धनवटे, जीवन रायते, मुजाहिद शेख, प्रशांत वाघ, नदीम शेख, मुरलीधर भामरे, राजेंद्र शेळके, सागर लामखेडे, संतोष जगताप, गौतम पगारे, राजेश भोसले, दीपक वाघ, नाना पवार, सुनिल अहिरे, पूजा आहेर, डॉ.संदीप चव्हाण, मुकेश शेवाळे, जय कोतवाल, हर्षल चव्हाण, सुनिल घुगे, लता नागरे, संगीता पाटील, योगिता पाटील, रुपाली तायडे, मंगल मोरे, पुष्पा वाघ, संजिवनी जाधव, कविता कट्यारे, भारती पगारे, विनोद डोके, रविंद्र शिंदे, रितेश केदारे, अक्षय परदेशी, कृष्णा काळे, सागर मोटकरी, अशोक पवार, आसाराम शिंदे, निधी जाधव, तन्मय शिंदे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी ,नाशिक ,एम डी टी व्ही न्यूज ..