घरफोडीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार आरोपीतास केले जेरबंद..

0
350

नाशिक -२८/५/२३

गुंडाविरोधी पथकाची धडक कारवाई

उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्याकडील गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 174 /2022 224 हे गुन्ह्यातील आरोपी नामक अजय सुनील वडनेरे राहणार उपनगर नाशिक यास मुख्य न्याय दंडाधिकारी नाशिक यांनी दोन वर्ष कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावला होता..
सदर बंदी कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यास covid-19 अभिवचन रजेवर सोडण्यात आलं होतं..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

परंतु हा 16 6 2022 पासून मध्यवर्ती कारागृह येथे हजर होणे गरजेचे असताना तो सदर कालावधीत अनुपस्थित राहिला..
आरोपींचा शोध घेण्याकरता अंकुश शिंदे पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण चव्हाण पोलीस उपयुक्त गुन्हे यांनी गुंडविरोधी पथक यांना आदेशित केलं होतं..
त्या अनुषंगाने अजय वडनेरे हा पेठ पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण हद्दीत स्वतःचे अस्तित्व लपवून वास्तव्य करीत असल्याबाबतची माहिती पोलीस अंमलदार गणेश भागवत यांना खबरींकडून मिळाली
त्यावरून पोलीस पथकाने सापळा रचला
या पथकाचे पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील अंमलदार यांनी ननाशी गाव आयटीआय जवळ पेट्रोल पंपा समोर पेठ जिल्हा नाशिक येथून ताब्यात घेत सदर आरोपीतच पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं..
या पथकाने विशेष कामगिरी बजावत या आरोपीतास जेरबंद केलं..
या पथकात गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, गणेश भागवत ,अक्षय गांगुर्डे ,राजेश सावकार ,सुनील आडके प्रदीप ठाकरे, मिलिंद जगताप, गणेश नागरे यांनी संयुक्तरित्या कामगिरी बजावली..

आणि या घरफोडीच्या गुन्ह्यातील शिक्षा लागलेल्या आरोपी याला जेरबंद करण्यात यश मिळवलं..
तेजस पुराणिक,नाशिक जिल्हा प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here