शिंदे ‘मातोश्री’वर रडल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा; भुसेंनी आरसा दाखवला, म्हणाले..

नाशिक /मुंबई -१६/४/२३

 एकनाथ शिंदे यांनी बंड का केले, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘भाजपबरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील, असं सांगत एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले होते, असा खुलासाच आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

जवळपास 9 महिनेआधी 40 आमदारांसह बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत, आदित्य ठाकरेंनी गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.

यावरून आता राजकारण चांगलचं तापलं आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भूसे यांनी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

SPONSORED CONTENT

नेमकं काय म्हटलं दादा भुसे यांनी?

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

हा एक केविलवाणा प्रयत्न आहे.

बालिशपणा आहे असं मला वाटत.

जर असं होतं तर त्यांनी त्याचवेळी बोलायला हव होतं. 1857 चं त्यांना आज आठवलं तर कसं चालेलं.

ही राहुल गांधी स्टाईल आहे. ते बाहेर जाऊन देशाची बदनामी करत आहेत. हा मविआच्या संगतीचा परिणाम आहे. विकास कामं होत आहेत म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला दादा भूसे यांनी लगावला आहे.

राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेणार

दरम्यान राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. भाजपविरोधात मजबूत आघाडी निर्माण करण्याचं काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र राहुल गांधीच्या भेटीचं अद्याप कोणतंही नियोजन नसल्याचं काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

तेजस पुराणिक,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नाशिक

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here