गाणं गायला अनेकांना आवडतं.
सामान्यत: एखादा व्यक्ती आपली मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधील गाणी म्हणू शकतो.
इतर भाषांमधील एखादं सुपरहिट गाणंही आपण सवयीनं म्हणून शकतो.
पण, एखाद्या व्यक्तीला एक किंवा दोन नाही तर तब्बल 15 भाषांमध्ये गाणी गाता येतात, असं सांगितलं तर?
तुम्हाला आश्चर्य वाटेल.
15 भाषांमध्ये गाणी गाणारी ही व्यक्ती फक्त 6 वर्षाची आहे, असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य आणि कौतुक वाटेल.
6 वर्षांच्या मुलीनं हे शक्य केलंय. नाशिकच्या द्वारका परिसरात राहणाऱ्या रज्जाक आणि वृषाली शेख यांची सहा वर्षांची रायमा विविध 15 भाषेत गाणी गाते.
रायमाच्या आई वृषाली या अंध आहेत. पण, त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड आहे.
त्यामुळे त्यांनी रायमला याचे बाळकू दिले आहेत. आईचं गाणं रायमानं अगदी नकळत्या वयात ऐकलंय
आणि तिनं ते आत्मसातही केलं आहे. गाण्यातील तिचं कौशल्य पाहून प्रत्येकालाच तिचं कौतुक वाटतं.
लता मंगेशकर या रायमाच्या आवडत्या गायिका आहेत. ती दिवसभर लतादीदींची गाणी गुणगुणत असते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/36S6BFu
रेकॉर्डबुकमध्ये नोंद
सहाव्या वर्षीच 15 भाषांमध्ये गाणी गाणाऱ्या रायमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. ‘रायमाला एखादी गोष्ट लवकर लक्षात राहते. गाणं एकदा ऐकलं की ते तिच्या डोक्यात पक्क बसतं.
त्यानंतर ती त्या पद्धतीनं गाणं गाते,’ असं तिचे वडील रझ्झाक शेख यांनी सांगितलं.
रायमाची आई वृषाली शेख या अंध आहेत.
त्यांना काहीही दिसत नाही, मात्र त्यांनाही लहानपणापासून गायनाची आवड असल्यामुळे त्यांनीही अनेक गाणी गायली आहेत, तसेच तयार देखील केले आहेत.
‘लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांना आदर्श मानणाऱ्या रायमानं त्यांच्यासारखंच मोठं गायक व्हावं,’ अशी इच्छा वृषाली यांनी बोलून दाखवली.
कोणती गाणी गाते?
1.मराठी – ऐरनीच्या देवा 2. गुजराथी – वैष्णव जन तो 3. संस्कृत – श्री रामचंद्र कृपाळू भज 4. भोजपुरी – ए चंदा मामा 5. कोकणी – माजे राणी माझे मोगा 6. तमिळ – अरोरा आरोरा 7. मल्याळम – कदली कंकदली चेनकदली 8. इंडोनेशियन – दी तेपी पानताय9 . इंग्लिश – यू नितेड मी 10.मैथिली – सूनु सुणू रसिया 11. बंगाली – तोमादरे आयोरे आज 12.पंजाबी – लईया ते तोड निभावी 13.राजस्थानी – ठाणे काई काई बोल सुनावा 14.उर्दू – बेलस पे करम 15.हिंदी – आपकी नजरोने समझा
रायमाच्या पुढील वाटचालीस एम डी टी व्ही न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा ..
तिच्याकडून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी असंच आहे ..
तेजस पुराणिक,जिल्हा प्रतिनिधी एम. डी. टी. व्ही. न्यूज नाशिक