Nashik News : पैशांचं टेन्शन सोडा, जिल्हा हॉस्पिटलमध्ये ‘ही’ ऑपरेशन होतात मोफत…

0
107

नाशिक -१३/४/२०२३

जिल्हा शासकीय रुग्णालयात अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.

विविध आजारांवरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जातात. त्या आरोग्य सुविधांचा नागरिकांनी फायदा करून घेणं गरजेचे आहे. खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेऊन तिथे अनावश्यक पैसे घालवणे योग्य नाही.

सर्व सामान्य नागरिकांना लाभ मिळावा चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील लाभ घेणे आवश्यक आहे.

या आजारांवरील शस्त्रक्रिया होतात मोफत

प्रत्येक आजारावरील शस्त्रक्रिया जिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0

मात्र, एखाद्या आजारावरील तज्ज्ञ रुग्णालयात नसेल तर बाहेर बोलवून रुग्णांना सेवा दिली जाते. बिपिएल धारक, गरोदर माता, 42 दिवसांपर्यंतचे बालक, दिव्यांग व्यक्ती, वृद्ध नागरिक यांच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जातात. इतरांना शासन नियमानुसार अल्प दरात आरोग्य सेवा मिळतात.

डोळ्यांच्या सबंधित सर्व शस्त्रक्रिया, दंत शस्त्रक्रिया, रक्त वाहिण्यांसबंधित सर्व शस्त्रक्रिया, पाठीच्या, कंबरेच्या, पायाच्या शस्त्रक्रिया, कर्करोग अशा सर्व शस्त्रक्रिया जिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत केल्या जातात.

नागरिकांनी आरोग्य सुविधांचा लाभ घ्या

आपल्याला कोणीही खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला देत असेल तर त्या व्यक्तीचे न ऐकता जिल्हा शासकीय रुग्णालयात या आपल्याला झालेल्या आजारासंदर्भात माहिती द्या. डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या आपल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्व आजारांवरील डॉक्टर उपलब्ध आहेत.

जर एखाद्या आजारावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सांगितली तर ती देखील या ठिकाणी मोफत केली जाईल.

चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दिली जात आहे.

त्यामुळे सर्वांनी बाहेर खाजगी रुग्णालयात पैसे न घालवता मोफत उपचार करून घ्या, अशी प्रतिक्रिया नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय शैल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली आहे.

कुठे आहे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय हे गोल्फ क्लब मैदानाच्या अगदी समोर आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वररोड वरती आहे.

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचा संपर्क क्रमांक 0253 2576106 / 0253 2572038

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here