नाशिक :१८/३/२०२३
नो योर आर्मी या उक्तीला सार्थ करणार भारतीय तोफखाना दल देवळाली अंतर्गत सैन्य दलाच शस्त्रशक्तीचा दर्शन घडवणारं राज्यस्तरीय महाशस्त्र प्रदर्शन नाशकात दोन दिवसीय सुरू झालं..
नुकताच या महाशस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं..
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, चे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आयोजक आणि खासदार हेमंत गोडसे, आयोजक सागर मटाले, आर्टिलरी सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर ए रागेश, नाशिकच्या आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे, सीमा हिरे ,राहुल ढिकले आदी मान्यवरांची उपस्थिती होती…
महाराष्ट्रातील सर्वात मोठा शस्त्र प्रदर्शन मेळा हा राज्यस्तरावरील पहिलाच मानला जातो..
भारतीय संरक्षण खात्याच्या आदेशानुसार तोफखाना केंद्राकडून अशा प्रकारचे पहिले लष्करी शस्त्रास्त्रांचे राज्यस्तरीय प्रदर्शन नाशिक मध्ये भरवण्यात आलंय.
यापूर्वी राज्यात असं लष्करी तोफांचे प्रदर्शन भरवलं गेलं नाही असं सूत्रांनी सांगितले..
नाशिक सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील जनतेला तोफखान्याच्या शक्तिशाली आधुनिक तोफांसह रडार सिस्टम भूदलाकडे असलेल्या अत्याधुनिक रायफल्स अश्वारूढ सैनिकांकडून दाखवले जाणारे चित्त थरारक प्रात्यक्षिके बघण्याची संधी उपलब्ध झाली आहे…
भारतीय सैन्य दलाच्या पाठीचा कणा समजल्या जाणाऱ्या व युद्धात विजय निश्चित करण्यात निर्णायक भूमिका बजावण्याचे सामर्थ्य ठेवणाऱ्या तोफखाना केंद्राची शक्ती नाशिककरांना शनिवारपासून दोन दिवस रविवार रात्रीपर्यंत अनुभवता येणार आहे..
” याची देही याची डोळा ”असा प्रत्यय नाशिककरांना येणार आहे..
अत्याधुनिक तोफांसह रडार सिस्टम भूदलाकडे असलेल्या आधुनिक रायफल्स, अश्वारूज सैनिकांकडून दाखवल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिकांसह लष्करी बँड पथकाचा अनुभव घेता येणार आहे..
या संपूर्ण महाशस्त्र प्रदर्शनाचे आयोजन नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह युनायटेड व्ही स्टॅन्ड फाउंडेशन यांनी केलंय..
या शस्त्र प्रदर्शनाचे आयोजक फाउंडेशनचे अध्यक्ष सागर मटाले यांची आम्ही प्रतिक्रिया याबाबत जाणून घेतली.. ऐकूया ते नेमकं काय म्हणालेत..
तर या संपूर्ण प्रदर्शनाचा लाभ नाशिक मधून विविध शाळांनी आणि शाळांच्या विद्यार्थ्यांनी घेतला. प्रदर्शनाला भेट दिली..
या प्रदर्शनाबद्दल नेमक्या त्यांच्या काय भावना होत्या त्या आपण जाणून घेतल्या.. नाशिक रोड येथील एका शाळेच्या विद्यार्थ्यांना आपली मुक्तपणे प्रतिक्रिया मांडली ऐकूया नेमकं या विद्यार्थ्याने काय म्हटले
तर एका विद्यार्थिनीने देखील आमच्याशी संवाद साधला.. तिने नेमकं काय अनुभवलं प्रदर्शन पाहून ऐकूया..
हे महाशस्त्र प्रदर्शन 18 मार्च 19 मार्च 2023 असं दोन दिवसीय नाशिक मधील गोल्फ क्लब मैदानावर आयोजित करण्यात आले..
मोठ्या संख्येने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ”न भूतो न भविष्यती ”असं हे राज्यस्तरीय डोळ्याचे पारणे फेडणारे शस्त्र प्रदर्शन नाशकात अनुभवता येणार आहे..
सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत नागरिकांना, विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्याची आणि अनुभूती घेण्याची संधी लाभली आहे..
आपलं सैन्य नेमकं काय आणि सैन्य दलात काय चालतं हे जाणून घ्यायची संधी या रूपाने मिळाली आहे..
म्हणूनच या प्रदर्शनाचं मोटो आहे ”नो योर आर्मी..”
तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी, एम.डी .टी.व्ही न्यूज ,नाशिक