दिल्ली -१०/६/२३
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी मोठी घोषणा केली असून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24व्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत मोठ्या घोषणा केल्या. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी ही घोषणा केली.
शरद पवार यांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याशिवाय सुनिल तटकरे यांनाही पक्षाचे सरचिटणीस केलं आहे. मध्यप्रेदश, गुजरात, राजस्थान, झारखंडची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तर महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.दरम्यान, अजित पवार यांच्यावर कोणतीच जबाबदारी सोपवली नसल्याने त्याची चर्चा सध्या रंगली आहे.
हे सुध्दा वाचा:
BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS
BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS
BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीकाही केली. ते म्हणाले की, अनेक राज्यात आज भाजपला दूर ठेवण्याचं काम तिथल्या जनतेनं केलंयय. ज्या राज्यात भाजपची सत्ता आलीय तिथे भाजपची सत्ता नव्हती. आमदार फोडून, त्यांना लालच देऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न भाजपने केला असा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.
भाजपवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, हे सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलेलं नाही. देशातील बहुसंख्य राज्यात भाजपविरोधी लाट आहे. सध्या सर्वाधिक गरज आहे ती म्हणजे वेगवेगळ्या विचारांच्या लोकांनी एका कॉमन प्रोग्रॅमअंतर्गत पुढे यायला हवं.
ब्युरो रिपोर्ट ,एम डी टी व्ही न्यूज ,दिल्ली