नंदुरबार -११/७/२३
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी शहादा तळोदा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांची नियुक्ती केलेली आहे. नियुक्तीबद्दल नुकतेच प्राप्त झाले असुन त्यात पक्ष बळकटीसाठी, मजबुत करण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य पर्यत पोहोचविण्यासाठी आपण सहकार्य कराल असा विश्वास व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल उत्तर महाराष्ट्राचे जेष्ठ नेते मा.मंत्री आ. एकनाथ खडसे यांनीही माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचे अभिनंदन केले आहे.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
तसेच युवक प्रदेशाध्यक्ष . मेहबुबभाई शेख यांच्या मान्यतेने व . एकनाथ खडसे यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष पदी . नितिन रोहीदास जगताप यांची निवड करण्यात आली आहे. माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्याशी संवाद साधला असता पक्षाने दिलेली जबाबदारी मी स्विकारत असुन पक्षवाढीसाठी कामकाज करणार असल्याचे सांगितलेले आहे.
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले .. दोन्ही गटाच्या नेत्यांनी जुन्या आणि नव्या नेतृत्वाला संधी देत विविध नियुक्त्याचे सत्र सुरु केले असल्याचं चित्र पहायला मिळतंय ..
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा शहर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

