नंदुरबार-३१/५/२३
नगरपालिकेत असलेले अग्निशामक वाहन योग्य देखभाली अभावी नादुरुस्त झाले आहे.
आगीसारख्या घटना रोखण्यासाठी नगरपालिकेकडे केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. तळोदा शहरात कुठेही आग लागल्यास त्या आगेला तात्काळ शमविण्यासाठी पर्यायी कुठलेही व्यवस्था पालिकेकडे नाही.
नादुरुस्त असलेले वाहन दुरुस्त करण्याबाबत अद्यापही पालिका प्रशासनाने तसदी घेतलेली नाही.
त्यामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या तळोदा शहराचा विचार करता सुरक्षा तसेच भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्याच्यादृष्टीने तरी अग्निशामक वाहन तातडीने दुरुस्ती करून सेवेत कायम करावे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याशिवाय नगरपालिकेचे दूरध्वनी(02567-232231) सेवा खंडित झाल्याकारणाने कुठल्याही संभाषण संबंधित कार्यालयाशी होत नाही.
सदर सेवा देखील कायम करावी,
घंटा गाड्यांची अवस्था देखील बकाल झाली आहे.
त्यावर मार्ग काढण्यासाठी नगरपालिकेच्या खर्चातून ट्रॅक्टरची सोय उपलब्ध करून देण्याची गरज आहे….
राम रथ नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर झाला आहे मात्र त्याचे अद्याप लोकार्पण झालेले नसून सेवेत रुजू करण्यासाठी दक्षता घेऊन सदर रामरथ लोकांच्या सेवेत देणे गरजेचे आहे.
माननीय महोदया वरील सर्व बाबी या शहराच्या सुरक्षेचा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहेत त्या अनुषंगाने आपण तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा आहे
.निवेदनावर शहर अध्यक्ष योगेश मराठे,मा.बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,मा.नगरसेविका अनिता परदेशीं,शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी युवक तालुकाध्यक्ष कमलेश पाडवी शहर उपाध्यक्ष अनिल पवार, नदीम बागवान, संघटक शहर राष्ट्रवादी राहुल पाडवी,राष्ट्रवादी युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे शहर सहसंघटक मुकेश पाडवी,शोयब पठाण,नितीन मराठे, विकास क्षत्रिय,सागर खैरणार यांच्या सह्या आहेत ..
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा शहर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज