महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नवापूरला येणार !

0
284

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे दिनांक १५ जून रोजी नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत नवापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवापूर तालुक्यातील बोरपाडा येथील मातोश्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन व भूमिपूजन रुपाली चाकणकर व जयंत पाटील यांच्याहस्ते होणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

दि.१५ रोजी सकाळी ९ ते ९:३० या दरम्यान बोरपाडा येथे वृद्धाश्रम व महिला आश्रमचे उद्घाटन त्यानंतर सकाळी ९:३० वाजता बोरपाडा येथुन डोकारे येथे रवाना होतील. त्यानंतर सकाळी १०:१५ ते १०:४५ डोकारे येथे महिला कारखाना जागेचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते होईल. त्यानंतर सकाळी ११:३० वाजता नवापूर शहरातील लीलावती मॉल येथे आदिवासी अर्बन निधी लिमिटेड बँकेचे उद्घाटन होईल. दुपारी १२ ते १२:३० दरम्यान नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथे १ हजार महिलांना साडी वाटप, पूर्णागिरी सत्कार व पोलीस पाटील व सरपंच, उपसरपंच यांची समाज उपयोगी बैठक असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, माजी आमदार शरद गावित, शहादाचे माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी जि.प अध्यक्षा रजनी नाईक, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, संगीता गावित, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या निरिक्षक मिनाक्षी चव्हाण, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वप्निल मुदलवाडकर, गटविकास अधिकारी मानसिंग वळवी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे आदी मान्यवर कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम मातोश्री बहुउद्देशीय संस्था लहान शहादा, बोरपाडा यांनी आयोजित केलेला आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here