शिंदखेडा -२१/६/२३
NCP PROTEST:शिंदे गटाने केल्लेल्या बंडाच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौफुली शिंदखेडा येथे जोरदार घोषणा निषेधाचे बॅनर व खोके दाखवत जाहीर निषेध करत धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस व शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या वतीने गद्दार दिन साजरा करण्यात आला ..
युवक कार्याध्यक्ष निखील पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा दिवस प्रतीकात्मक स्वरूपात शिंदे गटाचा निषेध म्हणून साजरा झाला .. ‘50खोके,एकदम ओके‘च्या घोषणांनी शहर दणाणून सोडलं होत ..
वीस जुन रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह चाळीस आमदार शिवसेनेतून बंडखोरी करित भाजपा ला सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले होते. केवळ सत्तेसाठी नाहीतर पन्नास खोके घेतल्याचा आरोप देखील त्यावेळी करण्यात आला. आपल्या ४० आमदार आणि समर्थक खासदारांना सोबत घेऊन बंड केला आणि मूळ शिवसेनेत फूट पाडली .. त्याला १ वर्ष पूर्ण झाले .. म्हणुन हा दिवस गद्दार दिन साजरा करण्यात आला ..
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS
म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! |
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष निखील पाटील, धुळे जिल्हा ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक जगताप, राष्ट्रवादी युवकचे शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण पाटील, तालुकाध्यक्ष मिलींद देसले, ओ बी सी सेलचे जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी, माजी युवक कार्याध्यक्ष कमलाकर बागले, किरण देसले, तालुकाध्यक्ष ग्रंथालय सेल हर्षदीप वेंदे, दोंडाईचा युवक शहराध्यक्ष राहूल सोनवणे, जिल्हा सरचिटणीस भुषण पाटील, जिल्हा सचिव कपील पाटील, युवक जिल्हा संघटक योगेश पाटील, दोंडाईचा शहर कार्याध्यक्ष बापुजी मिस्तरी, ओ बी सी तालुकाध्यक्ष भुषण माळी, किसान सेल तालुकाध्यक्ष गुलाबराव पाटील, युवक ता.उपाध्यक्ष गणेश पाटील, रवी बापू पाटील, रहीम खाटीक, महेंद्र पाटील ,गणेश खलाणे , देविदास मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यादवराव सावंत ,प्रतिनिधी ,शिंदखेडा ,एम डी टी व्ही न्यूज ..