Dhule News Today: धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सज्ज..!

0
90
ncp-womends-are-Ready-to-participate-in-Nationalist-Womens-Mela-Dhule-News-Today

धुळे ( Dhule ) : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( NCP ) महिलांनी उद्या मुंबई येथे होणाऱ्या भव्य नारी निर्धार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सज्ज होऊन निघाले आहेत. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, ( Ajit Pawar ) अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) , मा.मंत्री सुनील तटकरे ( Sunil Tatkare ), मा.मंत्री प्रफुल्ल पटेल ( Praful Patel ), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.( Dhule News Today )

Dhule News Today : दोंडाईचा ( Dondaicha ) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ. पुजा खडसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, त्यांच्या उपस्थितीत दोंडाईचा,शिंदखेडा,शिरपुर,साक्री व धुळे तालुका आदी शहरासह ग्रामीण भागातुन महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र, मुंबई येथे होणाऱ्या भव्य नारी निर्धार मेळाव्याला जाण्याचा संकल्प केला आहे व आज दिनांक १७ जानेवारी रोजी पक्षाकडून मिळालेल्या लक्झरी बसने दुपारी तीन वाजता नंदुरबार चौफुली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक स्मारकापासुन मेळाव्याला जाण्याची सुरूवात करण्यात आली आहे.

ncp-womends-are-Ready-to-participate-in-Nationalist-Womens-Mela-Dhule-News-Today

मुंबई ( Mumbai ) येथे भव्य नारी निर्धार मेळावा १८ जानेवारी रोजी षण्मुखानंद सभागृह,सायन मुंबई येथे भव्य मेळाव्याचे नियोजन धुळे जिल्ह्यातुन महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन-जिल्हाध्यक्षा पुजा खडसे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कार्यक्रम स्थळी घेऊन जाण्यासाठी लक्झरी बसची व्यवस्थाषण्मुखानंद सभागृह , सायन, मुंबई येथे उद्या दिनांक १८ जानेवारी गुरूवार रोजी होणाऱ्या भव्य नारी निर्धार मेळाव्याला राष्ट्रवादी पक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजित दादा पवार,अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ,मा.मंत्री सुनील तटकरे, मा.मंत्री प्रफुल्ल पटेल,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य महीला अध्यक्षा  सौ.रूपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व मान्यवर मंडळी उपस्थितीत राहणार आहेत.( Dhule News Today )

तरी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी मोठ्या संख्येने भव्य नारी निर्धार मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ पुजा खडसे यांनी केले आहे.तसेच आज त्यांच्या उपस्थितीत पक्षाने उपलब्ध केलेल्या लक्झरी बसने दुपारी तीन वाजता नंदुरबार चौफुली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक स्मारकापासुन पन्नासच्या अधिक महिला कार्यकर्त्यांना एकत्र करत प्रवासाला सुरुवात केली आहे.

🏻 MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here