नंदुरबार : २३/३/२३
‘क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांची नावं उच्चारलं की अंगावर रोमांच उभे राहतात.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या, ऐन तारुण्यात हसत हसत फासावर जाणाऱ्या या क्रांतिकारकाच्या बलिदानाची कहाणी नेहमीच स्फूर्तिदायी, देशभक्तीची ऊर्जा निर्माण करणारी…
क्रांतीचे पोवाडे गाणाऱ्यांना हे क्रांतिवीर नेहमीच स्फूर्ती देतात.
अशाच स्फूर्तीदायी आठवणी जपल्या आहेत.
शहीद दिवस हा 23 मार्च रोजी साजरा केला जातो .या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भगतसिंग ,राजगुरु ,सुखदेव यांना या दिवशी फाशी दिली म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो .
आपल्या भारत देशात खूप मोठे क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत आपणाला माहीत आहेच या क्रांतिकारकांनी आपल्या भारत देशाला गुलामगिरीतून सोडवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
अनेकांनी आपल्या देशासाठी बलिदान देऊन आपल्या घरादाराचा देशासाठी त्याग केला म्हणून तर आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहे .असे स्वातंत्र्य उपभोगत असताना आपणाला ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली अशांना स्मरण म्हणून आज शहीद दिन म्हणून साजरा केला जातो, त्यांना विनम्र अभिवादन !
शहीद दिन हा दिवस सुखदेव ,राजगुरू, भगतसिंग यांच्या स्मरणार्थ जरी असला तरी भारत देशासाठी अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले, त्याग केला आहे आजही भारत देश सुखासमाधानाने शांततेत राहत आहे. तसेच सीमेवरती सैनिक डोळ्यात तेल घालून आपल्या भारतमातेला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.
शहीद दिवस हा 23 मार्च रोजी संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो या दिवशी इंग्रजांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिन्ही क्रांतीकारकांना एकाच दिवशी फाशी दिली होती म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.
महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना भालेर गावात शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी शहीद शिरीषकुमार फाऊंडेशनचे अध्यक्ष मुकेश नागराज पाटील यांनी शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांचा जीवनप्रवास बद्दल माहिती दिली.त्यावेळी संस्थेचे सदस्य नितीन बागुल सुमित बागुल,उमेश पाटील,रामेश्वर पाटील, गणेश बागुल,संदीप पाटील इ उपस्थित होते.
योगेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार