नंदुरबार :१६/३/२३
नंदुरबार शहराला विरचक धरण आणि आष्टी येथील शिवण नदी पात्रातील विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो.. मात्र सध्या चित्र वेगळच दिसतंय..
आष्टी ते नंदुरबार पर्यंत पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो..
ठिकठिकाणी पाईपलाईन ला एअर व्हॉल असून ते मागील काही महिन्यांपूर्वीच नवीन बसवले आहेत..
जिल्हा रुग्णालयाच्या पुढे भाऊ पेट्रोल पंपाजवळ एका व्हॉलला मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गळती लागली.. त्यामुळे पाण्याचं प्रचंड प्रमाणात वाहून राहिलं..
नंदुरबार नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असून कारभार कारभारी प्रशासक असून पाणीपुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष याकडे होतंय..
त्वरित दुरुस्ती करून पूर्वपदावर वाल आणण्याची व्यवस्था करावी.. होणारी पाण्याची नासाडी भविष्यात थांबेल हीच अपेक्षा..
मुळात नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून या जिल्ह्यात उष्णतेची लाट सर्वाधिक असते..
आणि त्यात अशा प्रमाणे पाण्याची नासाडी होत असेल तर सर्वांना पाणी कसं मिळणार..
सर्वांचे घसे कोरडेच राहणार का? घरातील जनतेला योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करणं गरजेचं असतं..
त्यामुळे ताबडतोब पाणीपुरवठा विभागांना गांभीर्याने दखल घेऊन याकडे लक्ष केंद्रित करावं हीच मागणी या परिसरातील लोक करीत आहे..
अन्यथा नागरिकांना नंदुरबार नगरपालिकेचे दार ठोठवावे लागणार..
अशी वेळ येऊ नये हीच अपेक्षा….
नारायण ढोडरे ग्रामीण प्रतिनिधी एम.डी.टी.वी न्यूज नंदुरबार