अक्कलकुवा -३/५/२३
अक्कलकुवा येथील मुमुक्षु नेहा नरेशचंद गोलेच्छा ह्या 29 मे रोजी जैन भगवती दीक्षा अंगिकारणार आहे
. त्यानिमित्ताने अक्कलकुवा येथील राहत्या घरासमोर पत्रिका लेखनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प.पू.खरतरगच्छाधिपति आचार्य भगवंत श्री जिनमणिप्रभसूरीश्वरजी म.सा. यांची आज्ञानुवर्तिनी प.पू. गच्छ गणनी साध्वी श्री सुलोचनाश्रीजी म.सा. यांची सुशिष्या प.पू.साध्वी श्री प्रियस्नेहांजनाश्रीजी म.सा. आदीं ठाणा 2 यांच्या पावन निश्रेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात साध्वी भगवंत यांचा मुखारबिंदने मांगलिक द्वारे करण्यात आले
तसेच मोक्षा गोलेच्छा हिने नवकार महामंत्र गायन केले.
यावेळी जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान श्री महावीर स्वामी यांनी 2579 वर्षा पूर्वी वैशाख सूद 11 दिवशी जैन शासन स्थापना केली होती
त्या निमित्ताने प्रत्येक वर्षी जैन समाज बांधव हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.
याबाबत शुभम भंसाली यांनी अधिक माहिती दिली
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
https://bit.ly/3UoK7E0
तसेच मुमुक्षु नेहा गोलेच्छा, वीरपिता नरेशचंद गोलेच्छा, विरमाता मंगलाबाई गोलेच्छा यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
तसेच ज्ञान वाटिका अक्कलकुवा येथील मुलीनी जैन धर्मावर आधारित गीतावर नृत्य सादर केले
कार्यक्रम दरम्यान प.पू.साध्वी श्री प्रियस्नेहजनाश्रीजी म.सा. यांनी जैन स्थापना दिन व मुमुक्षु नेहा गोलेच्छा यांचा दीक्षा निमित्ताने पत्रिका लेखन कार्यक्रमबाबत विशेष मार्गदर्शन केले
तसेच अक्कलकुवा पंचकोशितील जैन समाजातील वरिष्ठ लोकांनी पत्रिका लेखन केले
यावेळी मुमुक्षु नेहा गोलेच्छा व समस्त गोलेच्छा परिवार तर्फे सर्व समाज बांधवाना अक्षत वाटून आमंत्रण दिले.
सदर कार्यक्रमात विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांचं गोलेच्छा परिवारातर्फे स्वागत करण्यात आलं .
यावेळी वाजत गाजत अक्कलकुवा येथील श्री वासुपूज्यस्वामी जिनमंदिर येथे दर्शन करून प्रथम पत्रिका ठेवण्यात आली..
यावेळी कार्यक्रमात मोठ्या संख्यने समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राकेश बोहरा यांनी केले ..
महेंद्र डागा यांनी अधिक माहिती कार्यक्रमाबाबत दिली.
शुभम भंसाली ,एम डी टी व्ही न्यूज प्रतिनिधी ,अक्कलकुवा