नेर:- धुळे तालुक्यातील शिरधाणे ते चिंचवार रस्ता पाईप मोरीचे भूमिपूजन जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच नेर गटाचे जिल्हा परिषद तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य आनंदराव दत्तात्रय पाटील यांच्या गटातील विकास कामांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नेर गटाचे जिल्हा परिषद सदस्य आनंदराव पाटील हे गेल्या काही दिवसांपासून नेर गटाच्या विकास कामांच्या निधीसाठी प्रयत्न करत होते. त्याच अनुषंगाने धुळे जिल्हा परिषद अंतर्गत ५०५४ योजनेतून १५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात त्यांना यश आले आहे. यासाठी शिरधाने प्र.नेर गावासाठी शिरधाणे ते चिंचवार रस्ता पाईप मोरी या कामासाठी १५ लक्ष रुपयांच्या निधीच्या कामाचे उद्घाटन आज करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिरधाणेचे सरपंच सुरेश भिल, उपसभापती दिनेश भदाणे, सरपंच जिभाऊ सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य कन्यालाल भदाणे, बापू भदाणे, सोमनाथ भदाणे, साखरचंद भदाणे, ज्ञानेश्वर महाले, अमृत भदाणे, विनोद बन्सीलाल, बापु कन्यालाल, तंटामुक्ती अध्यक्ष गोरख भदाणे, माजी सरपंच वाय.बी.भदाणे, गोरख भदाणे, हिरालाल भदाणे, इंजिनिअर शुभम कोकरे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
दिलीप साळुंखे. एम.डी.टी.व्ही. न्युज धुळे.


