नेर: आदिवासी भिल संघटनेच्या साक्री तालुकाध्यक्षपदी गायकवाड

0
307

नेर :- साक्री तालुक्यातील म्हसदी येथील बापूराज गायकवाड यांची आदिवासी भिल संघटनेच्या साक्री तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच एकलव्य कमांडो युवाशक्ती महाराष्ट्र प्रदेशाच्या एकलव्य आदिवासी भिल संघटनेच्या साक्री तालुका अध्यक्षपदी बापूराज गायकवाड यांची नुकतीच तीन वर्षासाठी निवड करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष धर्मेंद्र बोरसे, संस्थापक उपाध्यक्ष मच्छिंद्र गायकवाड, मुख्य संघटक उत्तमराव माळीच, श्री गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
2e6f3b4f 25fa 44b2 8e81 c1a4d880c586

एकलव्य आदिवासी भिल संघटनेची विचारधारा समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करून समाजाला शिक्षण हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच भिल समाजाचे अस्तित्व, अस्मिता संस्कृतीचे जतन करून संघटनेच्या ध्येयधोरणाशी एकनिष्ठ राहून संघटना वाढवण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावी व प्रामाणिकपणे काम करावे, अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात करण्यात आली आहे.

SPONSORED CONTENT

बापूराज गायकवाड हे जिल्हा परिषदच्या म्हसदी गटाच्या सदस्या इंदुबाई मल्हारी यांचे पुत्र आहे. तसेच म्हसदीसह परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

दिलीप साळुंखे. तालुका प्रतिनिधी, एम.डी.टी.व्ही. न्युज धुळे

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here