नेर: येथील जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती मध्ये १५ जून रोजी चिमुकल्यांचे स्वागत करून शाळा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील होते. यावेळी निंबा खलाणे, श्री.अहिरे, ग्रामपंचायत सदस्य दयाराम चव्हाण, दीपक मोरे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती धुळेचे शालेय पोषण आहार अधीक्षक श्री.सोनार उपस्थित होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
प्रथम दाखलपात्र विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मुख्याध्यापक रामभाऊ पाटील व योगेश कोळी यांनी स्वतः विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून चिमुकल्यांना शाळेत आणले. त्यानंतर माता पालक संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका ललिता चौधरी व मदतनीस उपस्थित होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत पाठ्यपुस्तके व इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
हे सुध्दा वाचा
“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS
फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS
मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEW
मुख्याध्यापक रामभाऊ पाटील यांनी शाळेच्या विविध समस्या उपस्थितांसमोर मांडल्या. प्रामुख्याने वर्ग खोली, शालेय पोषण आहार इत्यादी लवकरात लवकर मिळावे अशी मागणी केली. त्यावर अधिक्षक श्री सोनार यांनी शाळेस लवकरात लवकर स्वतंत्र आहार सुविधा दिली जाईल. जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांनी देखील शाळेचे बांधकाम येत्या एक दोन महिन्यात सुरू करण्यात येईल असे आश्वासित केले. शाळेतील एकंदर कामकाज पाहून व पालकांशी संवाद साधल्यानंतर अधीक्षकांनी शाळेतील दोन्ही शिक्षकांचा सत्कार केला. तसेच प्रतिकूल परिस्थितीत देखील अतिशय जिद्दीने व जोमाने काम करून विद्यार्थी उपस्थिती आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यात यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS
फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS
मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEW
आज शाळेतील पहिल्या दिवशी विद्यार्थी खेळ, गाणी,गोष्टी, नृत्य यामध्ये रममाण झाल्याचे दिसून आले. शालेय पोषण आहारांतर्गत आज मिष्टान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ पाटील यांनी केले तर आभार योगेश कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थी पालक शिक्षक यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिवाजी पाटील, संतोष भदाणे, निलेश भदाणे, राकेश सोनवणे, श्री.कराड, भुषण पाटील, श्रावण सोनवणे, विजय गायकवाड, सोनल भदाणे, शोभाताई पाटील, सुवर्णा भदाणे, रंजना साळवे, चंद्रकला सोनवणे, उषाबाई सोनवणे, सुरेखा सोनवणे, मनीषा सोनवणे, रेखाबाई शिंदे आदी पालक उपस्थित होते.
दिलीप साळुंखे. एमडी.टीव्ही. न्युज धुळे ग्रामीण.