नंदुरबार -१७/४/२३
भारतीय संस्कृतीनुसार मातृ-पितृ देवोभव या उक्तीप्रमाणे आई-वडिलांची सेवा केल्यास कुठलीही देवपूजा आणि तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही.
वृद्धाश्रमाची वाट तर मुळीच दाखवू नये.असे भावपूर्ण उद्गगार वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी काढले.
शहरातील अंबिका कॉलनी परिसरात सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहात कथाकार अविनाश जोशी महाराज बोलत होते.
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ निमित्त रविवारी सायंकाळी श्रीकृष्ण सुदामा भेटीचा सजीव देखावाा साकारण्यात आला.यावेळी द्वारपालांसह कृष्ण सुदामाची भेट हृदयस्पर्शी ठरली. वाघेश्वरी चौफुली जवळील अंबिका कॉलनीत दुपारी तीन ते सहा वाजे पर्यंत कथा श्रवणासाठी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
दरम्यान मंगळवार दि. 18 एप्रिल रोजी श्रीमद् भागवत सप्ताह कथेची सांगता होणार असून सकाळी 11 वाजता महाप्रसादाचे वितरण होईल.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
भाविकांनी लाभ घेण्याचेा आवाहन कथा संयोजक निर्मलाबाई हिम्मतराव पाटील, राकेश हिम्मतराव पाटील, सोनल राकेश पाटील आणि पाटील परिवाराने केले आहे.
प्रवीण चव्हाण ,एम डी टी व्ही न्यूज प्रतिनिधी ,नंदुरबार