नंदुरबार : दि.१०/०२/२०२३
नॉट मी बट यु या एन.एस.एस.च्या ब्रीद वाक्याचा प्रत्यय येतो तो राष्ट्रीय सेवा योजनेतील हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून.. नंदुरबार जिल्ह्यातील कोळदा येथे भरलं होतं नंदुरबार लॉ कॉलेजच एन.एस.एस शिबिर..
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये ‘माझ्यासाठी नव्हे, आपल्यासाठी सेवा’ हे ब्रीद प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दहा दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर कायमच लाभदायी ठरतं.
नंदुरबार तालुका विधेयक समितीचे विधी महाविद्यालय यांचं हे शिबिर यंदा कोळदा येथे भरलं होतं. या दहा दिवसात त्यांनी 14 गावातील कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. तसंच त्या केंद्रातील रेडिओ विकास भारती स्टेशनला भेट देऊन माहिती जाणून घेतली.
मोफत कायदा सहाय्यता अधिकार या विषयावर त्यांनी गावात पथनाट्य सादर केलं.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत विधी सहाय्यतेचे धडे गिरवता आले.तसेच कृषी विज्ञान केंद्रातील हवामान सूचक यंत्राची पाहणी केली.
या शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन डी चौधरी सर यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं होत. राष्ट्रीय सेवा योजना एककाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर किरण मराठे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विजय हेमाडे यांनी यशस्वीरीत्या या हिवाळी शिबिराचे आयोजन केलं होत. हम सब मिलकर देश का अपने जग मे नाम जगायेंगे , एन एस एस का परचम लेकर आगे बढते जायेंगे हा संदेश या शिबिरातून स्वयंसेवकांनी दिला..
नंदुरबारहुन प्रवीण चव्हाण एम.डी.टी.व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार