नेर:- धुळे तालुक्यातील नेर केंद्रामधील नव्याने सुरू झालेली जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती या शाळेस आज अचानक अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली. गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी संजीव विभांडिक व केंद्रप्रमुख अपर्णा जोशी यांनी शाळा पूर्व तयारी अभियान अंतर्गत शाळेस आकस्मित भेट दिली. यावेळी शाळेतील शिक्षक रामभाऊ पाटील व योगेश कोळी विद्यार्थ्यांचा सराव घेताना दिसून आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शाळा पूर्वतयारी अभियान या शासनाने सुरू केलेल्या उपक्रमातील दिनांक २५ मे पासून पाचवा आठवडा सुरू झालेला आहे. यामध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचा सराव करून घेण्यात येत आहे. थोडक्यात नवीन विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक तयारी करून घेण्याचे काम या उपक्रमामधून प्रामुख्याने होत आहे.
या उपक्रमाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे हे तपासण्यासाठी गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी संजीव विभांडिक व केंद्रप्रमुख अपर्णा जोशी यांनी आकस्मित नेर केंद्रातील शाळांना भेटी देऊन खात्री केली. आज सकाळी महादेव वस्ती येथील शाळेत भेट दिली असता इयत्ता पहिली मधील विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने तसेच पालकांच्या मदतीने व सराव करताना दिसून आले.
यानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांशी व पालकांची संवाद साधला व आनंद व्यक्त केला. अधिकारी व विद्यार्थी एकमेकांमध्ये रममान झाल्याचे चित्र दिसून आले. शाळा नवीनच असल्याने पालकांनी शाळा, शिक्षक, वर्गखोल्या याविषयी अडचणींवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावर गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेसंबंधी सर्व अडचणी लवकरच दूर करून शाळेचे लवकरात लवकर बांधकाम पूर्ण केले जाईल, असे यावेळी उपस्थित पालकांना सांगितले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामदास सोनवणे, दिनेश सोनवणे, विक्रम भदाने, शिवाजी पाटील, सुनिल चौधरी, अशोक पवार, लालसिंग गायकवाड, दिपक पवार, कराड दादा, संतोष भदाने, सोनल भदाने, शोभा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
दिलीप साळुंखे. एम.डी.टी.व्ही. न्युज धुळे.