भडगाव 🙁 Kajgaon )कजगाव तालुक्यातील पारोळा चौफुलीवर आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बस-दुचाकी अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून चालत असलेल्या 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे, तर 16 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास निंबा भिवसन कोळी (वय 60, रा. गुढे, ता. भडगाव) आणि प्रसाद रवींद्र चौधरी (वय 16, रा. पिलखोड, ता. चाळीसगाव) हे दोघे दुचाकीवरून गोंडगावहून कजगावकडे येत होते. त्याचवेळी पुणे-एरंडोल मार्गावरून कजगावहून भडगावकडे जाणाऱ्या एसटी बसला (क्रमांक MH 20 BL 2652) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक झाली.
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
अपघातात दुचाकीस्वार निंबा कोळी आणि प्रसाद चौधरी हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, निंबा कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातातील तरुण प्रसाद चौधरी याची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे पारोळा चौफुलीवर काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती.
पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी