पुन्हा एकदा तलवारींचा साठा जप्त; शिरपूर शहर पोलिसांची कारवाई..

0
107

साक्री /धुळे -१६/४/२३

शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना दि.१३ एप्रिल रोजी रात्री २१:३० वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली होती.
शिरपूर फाटा येथे दोन इसम आपल्या लाल रंगाच्या फॅशन प्रो मोटारसायकल क्र.एम.एच १८ ए.यु ९५०२ हिच्याने येत असून त्यांच्याकडे तलवारी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी सदर इसमांना पकडून त्यांच्यावर कारवाई करणेबाबत डी.बी. शोध पथकाचे पोहेकॉ, ललित पाटील यांना आदेशीत केले.
त्यानंतर पोहेकॉ, ललित पाटील यांनी दोन पंच व डी.बी.पथकाचे अंमलदार यांच्यासह माहितीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता माहिती प्रमाणे तेथे लाल रंगाची फॅशन प्रो मोटारसायकल क्र.एम. एच१८ ए.यु ९५०२ हिच्याने येणारे इसम नामे १) रोहित राजेंद्र गिरासे वय २४ २) मनिष ओंकार गिरासे वय १९ (रा. अहिल्यापूर ता. शिरपूर जि. धुळे.) यांना पंचांसह २२:४५ वाजता छापा टाकून शिताफीने पकडले.
तेंव्हा त्यांच्या मो.सा.च्या उजव्या बाजूस सीट लगत प्लास्टिकच्या कागदात एक तलवार दोरीने बांधलेली मिळून आल्याने त्यांच्याकडे अजून किती तलवारी आहेत, व त्या कुठे ठेऊन असल्याबाबत विचारले असता रोहित गिरासे याने, तो काम करीत असलेल्या गॅरेज मध्ये बाकीच्या तलवारी ठेवल्याचे सांगून त्याने अमोदे शिवारातील शिरपूर फाट्यावरील बालाजी ऑटो पार्ट्स नावाने असलेल्या मोटार गॅरेजच्या निकामी स्पेअर पार्ट्सच्या अडोशाला पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक गोणीत ठेवलेल्या एकूण १० तलवारी पंचांसमक्ष काडून हजर केल्याने सदर इसमाकडून एकूण ११ तलवारी ०२ मोबाईल व मो.सा.सह एकूण १,०३,००० रु.की.चा मुद्देमाल हस्तगत केला ..
त्यांना त्याब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोकॉ, सचिन वाघ यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७(१)(३) चे उल्लंघन १३५ सह शश्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल केला ..

c3b76382 3b00 442a 986d 1fef262dabde
1

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर, चार्ज उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपूर. शिरपुर, पोउनि गणेश कुटे, पोउनि संदीप मुरकूटे, पोहेकॉ, ललित पाटील, लादूराम चौधरी पोना,मनोज पाटील, रविंद्र आखडमल, पोकॉ, कैलास चौधरी, गोविंद कोळी, विनोद अखडमल, मुकेश पावरा, प्रशांत पवार, योगेश दाभाडे. मनोज दाभाडे, स्वप्नील बांगर, अमित रणमळे, भटू साळुंखे, सचिन वाघ, आरीफ तडवी, सनी सरदार यांच्या पथकाने केली ..
जितेंद्र जगदाळे ,साक्री प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here