जुन्या वादातून घटना : पोलिसात गुन्हा दाखल

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील सिंधीदिगरचा कात्रीपाडा येथे जुन्या वादातून तिरकामठ्याने कपाळावर बाण मारुन एकास जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील सिंधीदिगरचा कात्रीपाडा येथील नारला मालसिंग पावरा व दलसिंग धना पावरा यांच्यात जुना दहेज देणे-घेण्यावरुन वाद झाला.
या वादातून नारला पावरा यांना दलसिंग पावरा याने शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच अनिल दलसिंग पावरा याने तिरकाठ्याने कपाळावरील उजव्या बाजूस बाण मारुन दुखापत केली.
याबाबत नारला पावरा यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.योगेश निकम करीत आहेत.

