साक्री – पिंपळनेर रस्त्यावर कांदा उत्पादकांचा रास्तारोको

0
299

दोन तास आंदोलन ; दुतर्फ़ा वाहनांच्या लागल्या रांगा : अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

धुळे :- कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव थांबवून साक्री – पिंपळनेर रस्त्यावरील सामोडे – म्हसदी फाट्यावर सुमारे दोन तास रस्ता रोको केला. यामुळे यामार्गावरची वाहतूक ठप्प होत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नायब तहसीलदार रवींद्र शेळके व सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर कांद्याचा पुन्हा लिलाव सुरू झाला व कांद्याला काही अंशी चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यानी आंदोलन मागे घेतले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पिंपळनेर उपबाजार समितीचा जागेअभावी सामोडे – म्हसदी फाटा येथे कांदा लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार गुरुवार रोजी ( दि.२५ ) व्यापाऱ्यांनी कांद्याचा लिलाव बोली २०० पासून ते ३५० पर्यंत केली. त्यापैकी काही वाहनांचा लिलाव झाला असला तरी अल्प किमतीत भाव असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळनेर – साक्री रोडवर रस्ता रोको केला. संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याला वाढीव भावाची मागणी केली असता भाव वाढवून मिळत नसल्याने, शेतकऱ्यांनी संघटित होऊन संतप्त होत आंदोलनाला सुरुवात केली. कांदाने भरलेले वाहन रस्त्याच्या दोन्ही बाजूने आडवी करण्यात आले.

8383b6e9 836e 4932 b800 0879aa79a63e

यावेळी रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. नायब तहसीलदार व पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पुन्हा लिलाव घेण्यात आला. दिवसभरात अंदाजे ४०० ते ४५० वाहनांचा लिलाव करण्यात आला. सर्व कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केला. यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या शेतकऱ्यांनी कांद्याला भाव वाढ मिळाली पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांकडे कांदा असून भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. नायब तहसीलदार रवींद्र शेळके व सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी शेतक-यांशी चर्चा केली. कांद्याचा पुन्हा लिलाव घेऊन योग्य भाव द्यावा, असा तोडगा यावेळी निघाला. त्यानंतर काही अंशी भाववाढ मिळाल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल विकण्यास पसंती दिली.

दिलीप साळुंखे. एम.डी.टी.व्ही. न्युज धुळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here